सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांच्या घोटाळ्यांबाबत वरिष्ठ कार्यालयात वरिष्ठांकडे अनेक तक्रारी दाखल आहेत. त्या तक्रारींची चौकशी पूर्ण झाली नाही. असे असताना विष्णू पाटील यांना एनओसी देऊन त्यांची पेन्शन व इतर सोयी, सुविधा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी सदरच्या घोटाळ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांची पेन्शन देऊ नये, अशी लेखी मागणी महालेखाकार, मुंबई यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी केली आहे.
हे ही वाचा Corruption in CS Office | जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत
जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, यापूर्वी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांच्या विविध लेखी तक्रारी वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले आहेत. तसेच त्यांच्याबाबत आम्हीही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांच्या चौकशा सुरू आहेत. त्या-त्या चौकशी समितीचे अहवाल अद्याप आले नाहीत. त्यामुळे कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांच्या तक्रारी आणि घोटाळ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची पेन्शन व इतर लाभ, सोयी-सुविधा त्यांना देण्यात येऊ नये.
हे ही वाचा
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील हे 30 सप्टेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी पेन्शनबाबतची केस महालेखाकार यांच्याकडे सादर केली आहे. तरी सदरच्या चौकशा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पेन्शन आणि इतर लाभ देण्यात येत असलेल्या फाईली तर्तू मंजुर करू नये. कारण त्यांनी केलेले घोटाळे आणि त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींवरील अद्याप चौकशी पूर्ण झालेल्या नाहीत. संबंधीत चौकशी पूर्ण झाल्यानंतर व चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांना पेन्शन देण्यात यावी.
हे ही वाचा पाटील, काकडे, लोमटे यांना बडतर्फ करा
कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांनी सेवेत कार्यरत असताना वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या व अनुकंपा मधील उमेदवारांकडून पैसे घेऊन ऑर्डर दिल्या आहेत. या नियुक्त्यामध्ये आर्थिक देवणा-घेवाण केली आहे. PCPNDT आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत नविन नोंदणी आणि नुतणीकरणासाठी खासगी व्यावसायिकांनी भरलेले चलन वेळेवर बँकेत न भरता ते स्वतः वापरले आहे. त्यानंतर ते बँकेत भरले आहे. त्यामुळे शासकीय रकमांचा त्यांनी सोयीस्कररित्या वापर केला आहे. मेडिकल बिलांमध्ये टक्केवारी घेतली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीमध्ये MVG कंपनीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच ते ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे ढकलत नाहीत. त्यामुळे नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेऊन योग्य ती कारवाई करावी. जिल्हा औषध भांडारमधील खरेदीच्या देयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी टक्केवारी घेण्यास सुरवात केली आहे.
हे ही वाचा वित्तीय अनियमिततेत बिलिंग सेक्शन क्लार्कला उपसंचालकांकडून अभय ?
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट मधील हॉस्पिटलचे नवीन परवाने आणि नूतनिकरणसाठी लोमटे यांच्या बरोबर संगणमत करून विष्णू पाटील हे एजन्ट ईसाक शेख मार्फत टक्केवारी घेऊन कामे करत आहेत. एजंट इसाक शेख हे सर्व चलणाची फी, सर्व कागदपत्रे आणि टक्केवारीचे पैसे घेऊन थेट जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात येतात. त्यानंतर त्यांच्याकडेच सर्व परवाने उपलब्ध करून दिले जातात, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. तरी या सर्व प्रकरणात कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांच्या कालावधीतील त्यांनी वर्ग 4 मधील अनुकंपाच्या दिलेल्या सर्व ऑर्डर, लोमटे यांच्या बरोबर त्यांनी बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टमधील नविन आणि नुतनीकरण परवाने, काकडे यांच्या कालावधीतील PCPNDT चे नविन आणि नुतनीकरण परवाने आणि एजंट ईसाक शेख या सर्वांचे फोनवरील संभाषण, GooglePay, PhonePay वरील आर्थिक व्यवहार आदी सर्व प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे सदरच्या चौकशीअंती कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांची पेन्शन व अन्य फाईलला मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी महालेखाकार यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयास सादर करा