सोलापूर : प्रतिनिधी
अकलूजमधील एका खाजगी दवाखान्यात सोनोग्राफी सेंटरची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परिणामी यातील अर्जदाराला सोनोग्राफी सेंटरच्या परवानगीसाठी सिव्हील सर्जन यांच्यासाठी एस. डी. काकडे यांनी 70 हजार रूपये रकमेची मागणी केली आहे, अशी लेखी तक्रार राम शंकर उंटद यांनी स्वतः लाचलुचपत विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केल्याची बातमी “सत्ताकारण”ने प्रकाशित केली होती. याची दखल घेत आणि संदर्भ देत उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयास सादर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा सोनोग्राफी सेंटर परवानगी : सिव्हील सर्जनसाठी काकडेंनी मागितले 70 हजार रूपये
वास्तविक पाहता यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्ताक शेख यांनी प्रधान सचिवांकडे विष्णू पाटील, लोमटे, काकडे आणि इसाक शेख यांची लेखी तक्रार केली होती. मात्र यावर चौकशी सुरू असतानाच काकडे यांची लेखी तक्रार ॲन्टी करप्शन विभागाकडे उंटद यांनी दिली आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात पुन्हा एखदा सोलापूरचे जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय चर्चेत आले आहे. यावर पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे सदरच्या प्रकरणातील तक्रारदाराने समाधान व्यक्त केले आहे.
हे ही वाचा प्रविण सोलंकी हटाव, औषध भांडार बचाव
काकडेची हकालपट्टी
शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्ताक शेख यांच्या तक्रारीनंतरही PCPNDT चा टेबल काकडे यांच्याकडेच ठेवण्यात आला होता. त्यानंत उंटद यांच्या लेखी तक्रारीनंतरही काकडेकडील PCPNDT चे कामकाज सुरूच ठेवले होते. मात्र काकडेंची लेखी तक्रार “सत्ताकारण”च्या हाती लागताच सदरची बातमी प्रकाशित करण्यात आली. परिणामी सध्या काकडे कडील PCPNDT टेबल वरून हकालपट्टी केली आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असून कारवाई तर होणारच, मात्र काकडेंचे प्रमोशनही रोखणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले.
हे ही वाचा ग्रामीण व नागरी भागातील 91 टक्के बालकांचे पोलिओ लसीकरण