सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील जवळपास 35 हजार कंत्राटी कर्मचारी गेल्या 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संपावर आहेत. आजतागायत त्यांचा संप सुरूच आहे. ज्यामध्ये फार्मासिस्टचा देखील समावेश आहे. याचा फटका शहरासह जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना बसत आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेच्या कित्येक नागरी आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना शिपाई, आशा वर्कर्स आदींकडून औषध-गोळ्यांचे वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ने कॅमेऱ्यात कैद केला आहे. यावरून येथील आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांना याचे जराही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे ? एखाद्या रूग्णाचा जीव गेल्यानंतर त्या जाग्या होणार आहेत का ? संबंधीत कर्मचारी संपावर गेल्यानंतर नागरी आरोग्य केंद्रातील रूग्णसेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांची नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
नई जिंगदी नागरी आरोग्य केंद्रासह जवळच्या इतरही नागरी आरोग्य केंद्रात “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ने स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्रात डॉ. गीता गावडे यांच्याकडून तपासणी करून घेतली. त्यांनी चिट्टीवर औषध-गोळ्या लिहून दिल्या. संबंधीत लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी गेल्यानंतर तेथे आशा वर्कर्स यांच्याकडून सरसकट सर्वच रूग्णांना त्याच त्या गोळ्या औषधे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. तर काही ठिकाणी शिपाई गोळ्या औषधे वाटप करत असल्याचे दिसून आले. यामध्ये आशा वर्कर्स आणि शिपाई यांच्याकडे औषध-गोळ्यांचे वाटप करणे, गोळ्या-औषधे हाताळणे व रूग्णांना औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करण्याचे कोणतेही शैक्षणिक ज्ञान नाही, डीग्री नाही, औषधांचेही ज्ञान नाही, शैक्षणिक आर्हता नाही, ते औषध-गोळ्या वाटप करण्यासाठी सुशिक्षीत फार्मासिस्ट नाहीत, असे असताना त्यांच्याकडून कशाच्या आधारे औषध-गोळ्यांचे वाटप केले जात आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे पहावयास मिळत आहे. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण भागांतील आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा नागरीकांना-रुग्णांना सामना करावा लागत आहे. रूग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध करून योग्य त्या औषध-गोळ्या देणे बंधनकारक आहे. परंतु ज्यांना औषध-गोळ्यांचे जराही ज्ञान नाही, अशा शिपाई आणि आशा वर्कर्स यांच्याकडून औषध गोळ्यांचे वाटप सुरू आहे. यामुळे रूग्ण बरा होण्यापेक्षा मृत्यू पावनार नाही कशावरून ? चुकीच्या औषध गोळ्यांमुळे संबंधीत रूग्णांना त्याचे साईड इफेक्ट होणार नाही का ? आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने या रूग्णांच्या जीवाशी खेळत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या पदावर शासन निर्णयानुसार किंवा महापालिकेच्या सेवा भरती नियमानुसार (15 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय) आरोग्य अधिकारीपदी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा