सोलापूर : प्रतिनिधी
बेगम पेठेतील अनेक इमारतीमधील पार्किंगच्या जागेत अनधिकृत उद्योग-व्यवसाय सुरू असल्याची तक्रार 9 महिन्यांपूर्वी दिली होती. यावर मनपा आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांनी अद्यापपर्यंत काहीच कारवाई केली नाही. मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीने कामे करून जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांचे चांगल्या अधिकाऱ्यांना नेहमीच पाठबळ आहे. परंतु सोलापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले या जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, असा अनुभव आहे. त्या कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत माहित नाही. त्यामुळे सोलापूर महापालिकेस भित्रा नको, तर सक्षम असा IAS आयुक्त हवा (Solapur Needs Capable IAS Commissioner), अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) मुस्ताक शेख यांनी केली आहे.
हे ही वाचा पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उभारलेल्या उद्योग-व्यवसायांचा अहवाल आयुक्तांच्या टेबलवर
अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) मुस्ताक शेख म्हणाले, आयुक्त सत्ताधाऱ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत. सर्व कागदोपत्री पुरावे देऊनही कामे होत नाहीत. संबंधीत अधिकाऱ्यांना फक्त मोजमाप घेऊन येणे, सदरच्या जागेची पाहणी करणे, अहवाल तयार करून ठेवायला सांगणे अशी कामे गेली 9 महिने सुरू आहेत. मात्र 9 महिन्यानंतरही वस्तुस्थिती पाहूनही कारवाई का केली जात नाही ? मोजमाप, जागेची पाहणी आणि अहवाल तर कशाला तयार केला आहे ? त्यानंतर कारवाई का केली जात नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे असले आयुक्त आम्हाला नको. कोणालाही न भिणारा आयुक्त आम्हाला पाहिजे. आयुक्त मॅडम चुकीचे काम करणाऱ्यांना साधी नोटीसही काढत नाहीत. त्यामुळे येथे त्यांना नागरीकही घाबरत नाहीत. परिणामी अद्यापही बेगम पेठेत अनधिकृत दुकानदारी सुरू आहे. नागरिकांना, सर्वसामान्यांना आयुक्त नेहमी उलट उत्तर देत असतात. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदरची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करून सोलापूरला सक्षम, न भित्रा IAS अधिकारी देण्याची मागणी (Solapur Needs Capable IAS Commissioner) करणार आहे.
अकुलवार यांचा प्रामाणिकपणा आणि आयुक्तांच्या टेबल वरील अहवाल पुढे सरकेना
– तक्रार दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या प्रमुख सारिका अकुलवार यांनी प्रामाणिकपणे आणि तत्काळ सदरच्या जागेची पाहणी करण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना पाठवले. त्यांच्याकडील वस्तुस्थिती घेऊन अहवालही तत्काळ आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांच्या टेबलवर ठेवल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर आयुक्तांकडून कारवाईचे किंवा कोणतेच आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले जात नाहीत. त्यामुळे बांधकाम विभागातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या आदेशाची वाट पाहावी लागत आहे. आदेशाविना कारवाई करता येत नाही. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक तेली-उगले या दर आठवड्याला (सोमवार आणि गुरूवार) जनता दरबार घेतात, परंतु प्रश्न सोडवतात का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यापूर्वी आयुक्त शितल तेली-उगले यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवल्याने त्यांचा सर्वसामान्यांकडून सत्कार केला गेला. परंतु त्यानंतर इतर नागरिकांना देखील सत्कार करण्याची संधी आयुक्त देत नाहीत, प्रश्न सोडवत नाहीत, असा प्रश्न तक्रारदार अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) मुस्ताक शेख यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा Contractor | मक्तेदारांनी मुदतीत काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई
CM Eknath Shinde | विठ्ठला समाजातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे