Solapur Ganeshotsav | गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असून मोठमोठ्या मंडळांनी गणेशमूर्ती प्रतिष्ठानेची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त ग्रामीण भागात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात फक्त तीनशे गावांनी ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक मिरवणुका काढून खर्च करण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वर्गणी बंधनकारक करू नये, वीज कनेक्शन अधिकृत घ्यावे, अशा पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. ध्वनी प्रदूषण होण्यापेक्षा पारंपारिक वाद्य वापरून गणरायाचे स्वागत करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे. Solapur Ganeshotsav
सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका
गणेशोत्सव निमित्त आगमन व विसर्जन मिरवणूक काढली जाते. मात्र काही समाजकंटक चुकुची माहिती पसरवू शकतात. त्यामुळे कोणीही सोशल मीडियावर अफवांना दाद देऊ नये. आक्षेपार्ह मेसेज किंवा व्हिडिओ खात्री न करता व्हायरल करू नये, अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. Solapur गणेशोत्सव
पोलिसांचा असाअसणार बंदोबस्त
अधिकारी : १६१
एसआरपीएफ तुकड्या : ०२
होमगार्ड : १२००
पोलिस अंमलदार : १६००
नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी : १५०