सोलापूर : रणजित वाघमारे
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना सन 2023-24 अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामात सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चक्क अपात्र मक्तेदारांना पात्र करून ड्रेनेज लाईन कामांचे टेंडर दिले आहे. तर सुरवातीला पात्र असलेल्यांना अपात्र ठरवले आहे. सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि नगर अभियंता कार्यालयातील अधिकाऱ्यांचा हा अजब गैरप्रकार उजेडात आला आहे. मर्जीतील मक्तेदांरासाठी अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची नेहमीच दिशाभुल होत असल्याचेही समोर आले असून याप्रकरणी सदरचे सर्व 4 ही टेंडर रद्द करून फेरटेंडर करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा कार्यकारी अभियंता कोंडेकर यांच्याकडून शासन निर्णयास डावलून मनमानी पध्दतीने अनेक टेंडरचे वाटप
प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडून नेहमीच शहर विकासाला प्राधान्य दिले गेले. त्यांच्याकडून अनेक विकास कामे मार्गी लागली, ज्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे, घणकचरा विभागाकडून शहरातील कचरा वेळेवर उचलला जाणे, उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहीनीत आयुक्तांचा सिंहाचा वाटा, विमानतळासाठी कारखाण्याची चिमणी पाडणे, केंद्र सरकारकडून धुळमुक्त सोलापूरसाठी कोट्यावधींचा निधी आणणे, शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्याच्या दिशेने कामकाज करणे, शासनाच्या सर्व निधीचे व शासकीय योजना मार्गी लागणे अशी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. मात्र एकीकडे प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले या सोलापूर शहरातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असताना दुसरीकडे मात्र महापालिकेतील काही अधिकाऱ्यांकडून आयुक्तांना चुकीची माहिती दिली जाते. चुकीच्या पध्दतीने टेंडर प्रक्रीया राबविली जाते. तरी आयुक्तांनी याची शहानिशा करून संबंधीत अधिकारी आणि मकतेदार यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा औषध महामंडळाकडून जादा दराने औषध खरेदी
यामध्ये 1) Tendr Id-2024_SMC_1016122 (कामाचे नाव : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना सन 2023-24 अंतर्गत पुलगम टेक्सटाईल ते ई. आर. टी. चौक ते नीलकंठ बँक ते इराबत्ती कारखाना पर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे) या (95 लाख 93 हजार 344 रूपये) टेंडर प्रक्रीयेत एकूण 9 मक्तेदारांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कागदपत्रांअभावी 9 पैकी 6 मक्तेदार अपात्र होते. मात्र यातील तीन मक्तेदार पात्र कसे ? त्यांची कागदपत्रे न तपासता त्यांना पात्र कसे केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये पहिल्या मान्यतेत मोरया कंस्ट्रक्शन, शाकंभरी कंस्ट्रक्शन आणि दयावान कंस्ट्रक्शन हे 3 मक्तेदार पात्र झाले तर गिरजाई इन्फ्रा प्रा. लि., मीना कंस्ट्रक्शन, आण्णाप्पा गुद्दोदगी, श्री. जय मातादी कंस्ट्रक्शन, राऊत कंस्ट्रक्शन आणि आकाश कंस्ट्रक्शन ॲण्ड अर्थ मुवर्स हे अपात्र ठरवले. मात्र दसुऱ्या मान्यतेत मोरया कंस्ट्रक्शन आणि शाकंबरी या दोघांना पात्र केले तर दयावान कंस्ट्रक्शन, गिरजाई इन्फ्रा प्रा. लि., मीना कंस्ट्रक्शन, आण्णाप्पा गुद्दोदगी, श्री. जय मातादी कंस्ट्रक्शन, राऊत कंस्ट्रक्शन आणि आकाश कंस्ट्रक्शन ॲण्ड अर्थ मुवर्स यांना अपात्र ठरवले. यामध्ये दयावान कंस्ट्रक्शन सुरवातीला पात्र असताना त्यांना त्याच टेंडरसाठी दुसऱ्या यादीत अपात्र का केले ? पात्र मक्तेदार सोडून उर्वरित दोन मक्तेदारांना काम देण्याचा उद्देश काय ? वर्कडन, सॉल्वंशी न तपासता मर्जीतील मक्तेदारांना टेंडर दिले गेले असल्याचे स्पष्ट आहे.
हे ही वाचा सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये घोळ
तसेच 2) Tendr Id-2024_SMC_1016209 (कामाचे नाव : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना सन 2023-24 अंतर्गत अक्कलकोट एमआयडीसी अंतर्गत मेहेर टेक्सटाईलस ते बेल सिर्यामिक हब ते करूणा हॉटेल पर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे) या (76 लाख 44 हजार 006 रूपये) टेंडर प्रक्रीयेत पहिल्या मान्यतेत गिरीजाई इन्फ्रा प्रा. लि., मीना कंस्ट्रक्शन, राऊत कंस्ट्रक्शन, श्री. जय मातादी कंस्ट्रक्शन, अण्णाप्पा गुद्दोदगी, गुरूराज कंस्ट्रक्शन, मामाश्री कंस्ट्रक्शन, अंकीता कंस्ट्रक्शन, श्रीराजलक्ष्मी कंस्ट्रक्शन, लामकाने भानुदास हरिदास आणि आकाश उत्तम कानडे हे 11 मक्तेदार सहभागी झाले होते. यापैकी राऊत कंन्स्ट्रक्शन आणि अंकीता कंन्स्ट्रक्शन हे दोन मक्तेदार पात्र झाले होते.
मात्र याच टेंडरच्या दुसऱ्या मान्यतेमध्ये 11 मधील पहिले पात्र असलेले अंकीता कंस्ट्रक्शन आणि राऊत कंस्ट्रक्शन हे अपात्र केले, तर त्यांच्याऐवजी दुसरेच मक्तेदार पात्र केले. अपात्र असलेले आकाश उत्तम कानडे आणि श्रीराजलक्ष्मी कंस्ट्रक्शन यांना पात्र करण्यात आले. यामध्ये कागदपत्रे न तपासता मक्तेदारांना मक्ता देण्यात आला आहे. पात्र केलेल्या श्रीराजलक्ष्मी कंस्ट्रक्शनची कागदपत्रे आढळून येत नाहीत. तसेच श्रीराजलक्ष्मी कंस्ट्रक्शनला कामाचा अनुभव नाही, सॉल्वंशी कमी आढळून येत आणि वर्कडन आढळून येत नाही, तरी त्यांना पात्र कोणत्या नियमाने केले ? तसेच सदरची टेंडर जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये निघाली. यासाठी टेंडरच्या आगोदरचे वर्कडन असणे आवश्यक आहे. मात्र आकाश उत्तम कानडे यांचा वर्कडन दाखला 24 जुलै 2024 रोजीचा दिला आहे, तरीही त्यांना पात्र कोणत्या नियमानुसार केले ? अनुभव नसताना त्यांना काम कोणत्या नियमानुसार दिले ? दोन्ही एजन्सीचे वर्कडन नसताना त्यांना एवढ्या मोठ्या रकमेचे काम कोणत्या आधारे दिले ? अधिकाऱ्यांनी ही सर्व नियमबाह्य टेंडर प्रक्रीया राबविली असून सदरचे टेंडर रद्द होऊन फेरनिविदा काढणे गरजेचे आहे.
हे ही वाचा