सोलापूर : प्रतिनिधी
School Competition : आज स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तत्पर ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यावरच विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे, असे मत सिद्धेश्वर देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त भीमाशंकर पटणे यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्यावतीने आयोजित कै. आबा गंभीरे शालेय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर लायन्सचे अध्यक्ष अमोल गवसने, सचिव मंजुनाथ दर्गो-पाटील, प्रा. राजशेखर येळीकर व बाळासाहेब भोगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी लायन्सचे अध्यक्ष गवसने यांनी सर्वांचे स्वागत केले. स्पर्धा संयोजक नरेंद्र गंभीरे यांनी प्रास्ताविक करून गेल्या २१ वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन लायन्सच्या माध्यमातून केले जात असल्याचे सांगितले. सदर स्पर्धेत एकूण १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदरची स्पर्धा (School Competition) यशस्वी करण्यासाठी श्रीकांत सोनी, राधिका सोनी, संतोष काबरा, मंगल काबरा गोविंद मंत्री, सुरेखा मंत्री, दिनेश बिराजदार, संज्योती बिराजदार, नितीन परकीपल्ली, अकबर मुल्ला, प्रकाश भुतडा,आरती निचाणी, संगीता नाडकर्णी सचिन पाटील ला.भगवान जाधव, ला.रमेश जैन, आदींनी विशेष सहभाग नोंदवला होता याप्रसंगी सुरेखा गंभीरे, संगीता नाडकर्णी, अमिता कारंडे, कु. अनुष्का कारंडे, कु. चिन्मयी मठ, कु. प्रियंका गंभीरे आदी उपस्थित होते सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील व कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. School Competition
Health Minister Tanaji Sawant | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काँग्रेसकडून गाजराचा हार