सोलापूर : प्रतिनिधी
श्री. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कामती खुर्द ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर या आश्रम शाळेतील 16 शिक्षकांना ज्या अधिकाऱ्याने बेकायदेशीर ठरवले आहे, सध्या त्याच अधिकाऱ्याकडून या आश्रमशाळेतील 16 शिक्षकांना वेतन अदा केले जात आहे. यावरून समाज कल्याणमध्ये वरिष्ठांचा जराही धाक नसून येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच सदरच्या बेकायदेशीर शिक्षकांना, बेकायदेशीरपणे वेतन अदा केले जात असल्याने शासनाचे दर महिन्याला लाखो रूपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अपात्र मक्तेदारांना पात्र करून दिले ड्रेनेज लाईन कामांचे टेंडर
यासंदर्भातील लेखी तक्रार संबंधीत विभागाचे मंत्री, प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण, मंत्रालय, मुंबई, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, पुणे यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल झाली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, संदर्भीय पत्र क्र. 1 व 2 नुसार श्री. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कामती खुर्द ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर या आश्रम शाळेतील सहशिक्षक नवले, फराटे, अंकुशराव, नामदेव, केदार, पाटील, इनामदार, फफाळ, शिंदे, माळी, पाटील, गुंड, घोंगडे, गणेशकर, खतीब आणि पौळ या 16 शिक्षकांची बेकायदेशीरपणे प्रशासकीय मान्यता व नियुक्त्या बनावट पत्रानुसार केल्या आहेत, तसा लेखी अहवाल श्रीमती मनिषा फुले यांनी संचालकांना देऊन कळवले आहे. तरी वरील सर्व शिक्षकांची प्रशासकीय मान्यतेच्या प्रती कार्यालयातील अभिलेख कक्षात उपलब्ध नसल्याचे व तपासात दिसून येत नसल्याचे पत्र माहिती अधिकारातून तत्कालीन अपिलीय अधिकारी तथा सहायक आयुक्त समाजकल्याण सोलापूर नागेश चौगुले यांनी कळवले आहे. तसचे संदर्भ क्रमांक 1, 2 आणि 3 चे कागदोपत्री व सबळ पुराव्याचा अहवाल श्रीमती मनिषा फुले यांना ज्ञात असून देखील त्या श्री. परमेश्वर प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल जब्बार साहेबलाल शेख आणि वरील सर्व 16 शिक्षकांशी आर्थिक देवाणघेवाण करून दरमाह वेतन अदा करतात का ? असा प्रश्न तक्रारीत उपस्थित केला आहे. परंतु यामुळे शासणाची लाखो रूपयांची फसवणूक होत आहे. यातील 16 शिक्षकांवर वेतनापोटी लाखो रूपयांची रक्कम खर्ची पडत आहे. यासंदर्भात श्रीमती फुले यांनी आपले जा.क्र.विजिसकअ-सो/आशा/कामती/08/09/132 विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सोलापूर यांचे कार्यालय, दि. 23/01/2009 नुसार दिलेला अहवाल. श्रीमती मनिषा फुले यांचे 28/03/2009 चे माननिय सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे समोरिल अपिलातील प्रतिज्ञालेख आणि सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सोलापूर यांचे जा.क्र.सआसकसो/माअअ/कामती/2023-24/5157/सोलापूर दि.12/10/2023 रोजीचे माहिती अधिकारातील पत्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे यास सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर म्हणून श्रीमती मनिषा फुले या जबाबदार आहेत. तरी त्यांच्यावर याबाबत जबाबदारी निश्चीत करून कठोर कारवाई करावी, तसेच यानंतरही कारवाई न झाल्यास आत्मदहन केले जाईल, असा इशारा तक्रारदार यांनी दिला आहे. त्यामुळे यावर प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण, मंत्रालय, मुंबई, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, पुणे यांच्याकडून काय कारवाई केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा कार्यकारी अभियंता कोंडेकर यांच्याकडून शासन निर्णयास डावलून मनमानी पध्दतीने अनेक टेंडरचे वाटप
घोटाळ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील यांची पेन्शन थांबवा