पुणे : प्रतिनिधी
Rohit Pawar’s Yuva Sangharsh Yatra | शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार Rohit Pawar आज विजयादशमीच्या मुहूर्तावर (24 ऑक्टोबर) युवा संघर्ष यात्रेस सुरवात करणार आहेत.
आज विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मुहूर्त साधून ते पुणे येथील महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन करुन या यात्रेस सुरुवात करणार आहेत. फुले वाड्यातून ही यात्रा पुढे लाल महाल, बालगंधर्व मार्गे टिळक स्मारकल येथे पोहोचेल. या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे यात्रेला संबोधित करतील. त्यानंतरत महात्मा फुले स्मारक ते टिळक स्मारक मंदिरापर्यंत रोहित पवारांचा रोड शो होईल. त्यानंतर यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
हे ही वाचा K. Kavita Akka | तेलंगणात भाजपचे डिपॉझिट जप्त होणार : केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचा दावा
युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहीत पवार यांनी युवकांच्या प्रश्नांसाठी जवळपास 800 किलोमीटर प्रवासाचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये पेपरफुटी प्रकरण, कंत्राटी पध्दतीने भरती, बेरोजगारी, शिक्षणाचे प्रश्न असे युवकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठवला जाणार आहे. साधारण 800 किलोमीटररची ही यात्रा 13 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. ही यात्रा जवळपास 45 दिवस चालेल आणि 7 डिसेंबर 2023 रोजी या यात्रेची सांगता नागपूर येथे होईल.