सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेत रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभाग मधील अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या नावे वसुली सुरू आहे. नाहक मक्तेदाराला त्रास देऊन त्यांच्याकडून टेंडरच्या बदल्यात आयुक्तांचे नाव पुढे करून राजरोसपणे वसुली केली जात आहे. तरी या गैरप्रकाराकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे.
रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांकडून टेंडरसाठी टक्केवारी न दिल्यास वाटाघाटी करून टेंडर बिलो ने भरावयास सांगितले जात आहे. मक्तेदाराने एकदा ऑनलाईन मधून स्पर्धा करून टेंडर मिळवल्यानंतर पुन्हा टेंडर बिलो ने करण्याचा विषयच येत नाही. परंतु संबंधीत अधिकाऱ्यांकडून मक्तेदारास पुन्हा बिलो ने काम करण्यास सांगितले जात आहे. टक्केवारी न दिल्यास मक्तेदारांना अशा प्रकारे स्वतःच्या नियम-अटी लावून त्रास दिला जात आहे.
हे ही वाचा अखेर डॉ. सुहास मानेंचा “मनमानी कारभार” थांबला; ओळखपत्राविना रूग्णांना मिळणार केसपेपर आणि उपचार
छोट्या रकमेचे टेंडर एकत्रित करून लहान मक्तेदाराला काम मिळू नये आणि मोठ्या कंपनीलाच कामे मिळतील, अशी व्यवस्था महापालिकेच्या रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. यावेळी प्रत्येक टेंडरच्या अटी व शर्ती मध्ये शासनाच्या नियमांना बगल देऊन अधिकारी स्वतःच्या नियम-अटींचा समावेश करून टेंडर काढतात. तसेच एक इस्टीमेट 5 लाखापर्यंत असल्यास, असे 30 इस्टीमेट एकत्रित करून दिड कोटींच्या टेंडरच्या नियम व अटी लावल्या जातात. यामुळे छोट्या ठेकेदाराला काम न मिळता मोठ्या कंपनीला कामे मिळण्यासाठीची व्यवस्था महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. 5 लाखाच्या टेंडरला 1 वर्षांची मुदत (लायबलिटी) आहे, तरी 5 लाखांचे 30 टेंडर एकत्रित करून दिड कोटींच्या टेंडरच्या अटी व शर्ती लागू केल्या जातात आणि त्याच कामांना 1 वर्षांऐवजी 3 वर्षांची मुदत (लायबलिटी) दिली जात आहे. अशा प्रकारे महापालिकेचे अधिकारी व मोठे मक्तेदार हे छोट्या मक्तेदारावर वारंवार अन्याय करून टक्केवार वसुलीचे काम करत आहेत.
तरी महापालिकेतील रस्ते विभाग आणि ड्रेनेज विभाग मधील अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा महापालिकेत पुन्हा “लामकाने आणि मंदेल्लू” प्रकरण घडण्याची चर्चा मक्तेदारांमध्ये आहे.
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात