लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या 312 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार Ramesh Kadam गेली 8 वर्षे तुरूंगात होते. त्यांची सध्या तुरूंगातून सुटका झाली आहे. यानंतर त्यांनी आज प्रथमच मोहोळ शहरात ‘परत आलो, परत लढणार’ अशी जाहिरातबाजी करत पुन्हा दमदार एन्ट्री केली आहे. येथील नागरिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी मोहोळ शहराबरोबरच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. यामुळे काही काळासाठी सोलापूर-पुणे हायवे जाम झाला होता. दुसरीकडे मोहोळचे राजकारण पुन्हा तापले असून अनगरकरांचे टेंशन पुन्हा वाढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पहा फोटोमधून रमेश कदम यांचे जंगी स्वागत, सत्कार आणि एन्ट्री…
फोटो : मोहोळ मध्ये कार्यकर्त्यांकडून हलग्यांच्या कडकडाडात माजी आमदार रमेश कदम यांचे स्वागत करण्यात आले.
फोटो : कार्यकर्त्यांकडून माजी आमदार रमेश कदम यांचे फोटो व सेल्फी घेण्यासाठी जमलेले कार्यकर्ते आणि नागरिक.
फोटो : माजी आमदार रमेश कदम यांचा सत्कार करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते आणि नागरिक.
फोटो : माजी आमदार रमेश कदम यांना पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक जमल्याने काही काळासाठी सोलापूर-पुणे हायवे जाम झाल्याचे चित्र.
फोटो : मोहोळ मध्ये माजी आमदार रमेश कदम यांची एन्ट्री झाल्याने राजकीय गणिते बदलणार असून अनगरकरांचे वाढणार टेंशन.
फोटो : आठ वर्षानंतरही माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ कायम.
फोटो : ‘परत आलो, आता आपण जो कौल देणार तो शिरसावंद्य मानूनच परत लढणार, जनतेशी संवाद साधणार’ अशी पोस्टरबाजी आणि वृत्तपत्रातून जाहिरात करत आज माजी आमदार रमेश कदम यांनी पुन्हा एखदा राजकीय वाटचालीस सुरवात केली आहे. दुसरीकडे पूर्वीप्रमाणेच त्यांचे स्वागत मोहोळकरांनी केले असुन यावेळी प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.