पंढरपूर : प्रतिनिधी
Raju Shettis Announcement : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यापुढे कोणत्याही राजकीय नेते-कार्यर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आज (ता. ३ ऑक्टोबर) पंढरपूरातून केली. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर येथे आज, मंगळवारी झाली. या बैठकीत पक्षसंघटनेबाबत त्यांनी वरील निर्णय (Raju Shettis Announcement) घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. याबरोबरच त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी राज्यातील साखर कारखानदारांनाही इशारा देत राजू शेट्टी म्हणाले, मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे थकीत ४०० रूपये दिले नाहीत. थकीत रक्कम दिल्याशिवाय एकही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. तसेच, केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील बंद त्वरित मागे घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच सरकारने ठरवून दिलेल्या साखर विक्रीच्या किंमतीपेक्षा राज्यातील साखर कारखान्यांना प्रती क्विंटल ५०० रूपये अधिकचे मिळाले आहेत. इथेनॉलचाही खरेदी दर वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन ४०० रूपये देणे अपेक्षित आहे. सदरची थकीत रक्कम लवकर शेतकऱ्यांनाद्यावी, अन्यथा संबंधीत साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाईचे समर्थन
- माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याने जीएसटीचा कर थकवल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावर शेट्टी म्हणाले, वैद्यनाथ साखर कारखान्याने जीएसटी कर भरणे अपेक्षित आहे. जीएसटीची कारवाई ही त्या-त्या विभागाची आहे, असं म्हणत वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईचे शेट्टी यांनी समर्थन केले.
- Raju Shettis Announcement
हे ही वाचा
Lingayat Community Reservation | आरक्षणासाठी लिंगायत समाजही आक्रमक