जनतेच्या पैशांची उधळपट्टी रोखून कमी व वाजवी दराने दर्जेदार औषधे खरेदी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने “औषध महामंडळा”ची (Maharashtra Medical Goods Procurement Authority) स्थापना केली. मात्र सध्या खुद्द औषध महामंडळानेच Tablets India Ltd आणि Hindustan Laboratories Ltd यांच्याकडून जादा दराने औषधे खरेदी केली असल्याची गोपनीय तक्रार PMO कार्यालय, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, Central Drugs Standard Control Organisation-Ministry Of Health-Gov Of India, Food & Drugs Administration-Mumbai/Maharashtra आणि ॲन्टी करप्शन कार्यालय-मुंबई यांच्याकडे दाखल केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे की, औषध महामंडळा” (Maharashtra Medical Goods Procurement Authority) ने Tablets India Ltd (Chennai-Tamil Nadu) यांच्याकडून Calcium Carbonate Tab + Vit D3 1.25gm ची खरेदी (19,49,76,320.00) केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील विविध जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाकडून याच Calcium ची खरेदी यापूर्वी 33 ते 40 पैशाला किंवा जास्तीत जास्त 1 रूपयाला केली आहे. दुसरीकडे औषध महामंडळाने सदरची कॅल्शीअमची खरेदी 4 रूपयाला केली आहे. परिणामी 5 कोटींची औषध खरेदीची रक्कम तब्बल 20 कोटीपर्यंत गेली आहे.
दुसरीकडे औषध महामंडळाने Hindustan Laboratories Ltd (Boriwali West-Mumbai) कडून Povidone Iodine Solution Scrub 7.5% 500ml ची खरेदी जवळपास 125 रूपयांवरून थेट 160 रूपयांना (99,43,113.60) तर Iron & Acid Drop 15ml ची (9,35,82,720.00) जवळपास 8 रूपयांची खरेदी 25 रूपयांना केली आहे. ज्यामुळे यामध्ये खरेदीचे दुप्पट ते तिप्पट दर वाढले आहेत. या खरेदी ऑर्डरवर औषध महामंडळाचे तत्कालीन जनरल मॅनेजर डॉ. उमेश शिरोडकर यांच्या सह्या आहेत. या खरेदीत औषध महामंडळातील Executive Committee, Tender Approval Committee आणि इतर अधिकारीही सामील आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर त्यांच्या जोडीला संबंधीत औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या व त्यांचे पुरवठादारही सहभागी आहेत. या कंपन्यांनी दर वाढवण्यासाठी नावालाच आणि नाहक औषधांचा फॉर्म्युला थोडासा बदलला आहे. इतर कंपन्यांच्या याच औषधांची मार्केटमध्ये किंमत खुप कमी आणि वाजवी आहे. मात्र त्या कमी किंमत असलेल्या कंपन्यांना ठेंगा दाखवत, सोयीस्कर नियम-अटी वापरून इतर कंपन्यांकडून गरज नसताना जादा दराने औषध खरेदी करण्यात आली आहे. या औषध खरेदीत पारदर्शकता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यातील अधिकाऱ्यांना निलंबीत करून आणि औषध कंपन्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करून निर्बंद लादावते, वाढीव खरेदीची रक्कम या सर्वांकडून वसुल करावी, अशी मागणी तक्रारदाराने तक्रारीत केली आहे.
यांच्यावर कारवाईची केली गेली मागणी
जादा दराने औषध खरेदी केल्याने या औषध खरेदीतील औषध महामंडळा” (Maharashtra Medical Goods Procurement Authority) तील खरेदी प्रक्रीयेतील Executive Committee, Tender Approval Committee मधील अधिकारी/सदस्य यांच्याबरोबरच Tablets India Ltd आणि Hindustan Laboratories Ltd या औषध कंपन्यांचे चेअरमन व त्या कंपन्यांच्या बॉडीवरील पदाधिकारी/सदस्य आणि या कंपन्यांनी नेमलेल पुरवठाधारक यांच्यावर कारवाई करावी. तसेच सदरच्या कारवाईसाठी वेगवेगळ्या शासनाच्या आस्थपना असल्याने यामध्ये PMO कार्यालय, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, Central Drugs Standard Control Organisation-Ministry Of Health-Gov Of India, Food & Drugs Administration-Mumbai/Maharashtra आणि अँन्टी करप्शन कार्यालय-मुंबई यांनी कारवाई करण्यासाठी सदरची तक्रार या सर्व विभागाकडे पाठवण्यात आली आहे.