सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
आरोग्य सेवा, पुणे मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. भगवान पवार यांची नियुक्ती झाल्यापासून पुणे सर्कलमधील सर्वच अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी खुर्चीत बसून आदेश देण्यापेक्षा स्वतः पुणे, सोलापूर आणि सातारा येथील शासकीय रूग्णालयांना रात्री 1 वाजता भेटी दिल्या. आरोग्यसेवेची पाहणी केली. उणिवा दूर करण्याच्या सूचना आणि उत्तम सेवेचे कौतुक केले. या तिन्ही जिल्ह्यात स्वतः बैठका घेत आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. परिणामी इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे “आरोग्य सेवेत पुणे सर्कल टॉपला” आणण्यासाठी खुद्द उपसंचालक डॉ. भगवान पवार हे स्वतः यंत्रणेसह दिवसरात्र कार्यरत राहिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
हे ही वाचा जिल्हा रूग्णालयात 92 बालरूग्णांच्या मोफत गंभीर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न
उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी नुकतीच आरोग्य सेवा, पुणे मंडळाची एमआयएस आढावा बैठक घेतली. या बैठकीस पुणे सर्कलमधील जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक व इतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत त्यांनी कमी परफॉर्मन्स असणाऱ्यांना मार्गदर्शन, भेटी वाढवण्याच्या सुचना, प्रत्येकांची हजेरी, आरोग्य विभागामार्फत राबवलेले सर्व कार्यक्रय आणि त्यांचा आढावा, सेवा नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मार्गदर्शन, योजना तळागाळापर्यंत पोहोचतायत का याची माहिती घेतली. तसेच पहिली मिटींग असल्याने प्रेमाने सांगतो, पुढच्या मिटींगमध्ये मला रिजल्ट पाहिजे. पुढच्या मिटींगमध्ये हयगय केली जाणार नाही, अशी तंबीही दिली. यामुळे आरोग्य सेवा, पुणे मंडळ मधील अधिकारी-कर्मचारी खऱ्या अर्थाने कामाला लागले असून नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यास आणखी मदत होणार आहे.

यापूर्वी आरोग्य सेवा, पुणे मंडळातील त्या-त्या उपसंचालकांनी खुर्चीत बसूनच आदेश देत पुणे सर्कलचा कारभार सांभाळला. पुण्यातील उपसंचालक कार्यालयातूनच पुण्यासह सोलापूर आणि सातारा येथील जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदींना आदेश सोडत कामकाज पाहिले. या तीन जिल्ह्यात आरोग्य मंत्र्यांचा दौरा असल्यानंतरच उपसंचालक कार्यालयातून बाहेर पडत असत. परंतु सध्याचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी स्वतः पुणे, सोलापूर आणि सातारा येथील जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे मिटींग, बैठका तर घेतल्याच आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांनी रात्री 1 वाजता शासकीय रूग्णालयांना अचानक भेटी दिल्या आहेत. तेथील आरोग्य सेवेची पाहणी केली आहे. सत्यता पडताळली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सकांनीही अधिनस्त शासकीय संस्थांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय दवाखन्यांमध्ये प्रसुतींची संख्या वाढवणे, ओपीडीमधील रूग्णांची संख्या वाढवणे, आहार, स्वच्छता व सुरक्षा याकडे लक्ष देणे, लसीकरणात वाढ, TB मध्ये जिल्हा कमी, याकडे लक्ष देण्याच्या व इतर त्या-त्या अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे सर्कल सध्या आरोग्य सेवेत आणखी पुढे जाण्यास मदत होत आहे. तसेच त्या-त्या संस्थांच्या प्रमुखांनीही समन्वय साधून नागरिकांना आरोग्य सेवा देण्यास कटीबध्द असले पाहिजे, अशा सुचना सर्वांना दिल्या आहेत.
– डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे.





