चिखली : प्रतिनिधी
चिखली तालुका किसान काँग्रेसच्यावतीने बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुचनेनुसार आज, 29 नोव्हेंबर रोजी येथील तहसिलदार यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करून शेतक-यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष समाधान गिते यांनी शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहीती तहसिलदारांना देऊन नुकसानीचा सर्व्हे करून शेतक-यांना तातडीने मदतीचा दिलासा देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
हे ही वाचा दुकानांवर तात्काळ मराठी पाट्या लावा, अन्यथा मनसे काळे फासणार
चिखली तालुका किसान काँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 2-3 दिवसांपासुन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील सर्वत्र 26 व 27 नाव्हेंबर रोजी पुन्हा जोरदार अवकाळी पाउस पडला. या धो-धो पडणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेल्या तुर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अति पाउस झाल्यामुळे हरबरा, करडी, ज्वारी, फळबाग व भाजीपाला पिकांचेही खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे नंतर येणारे धुके व खराब हवामानामुळे पिकांचे आणखी नुकसान होण्याचा धोका आहे. आधिच खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यातच या अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांचेही आशा मावळली आहे. अशावेळी सरकारकडुन मदतीची रास्त अपेक्षा व्यक्त करीत, शेतक-यांच्या नुकसानीचा सर्व्हे करून शेतक-यांना मदत मिळवुन देण्यात यावी. तसेच यापुर्वी खरीप पिक विमा व नुकसान भरपाईची मदतही अजुन मिळाली नाही. त्याबाबतही लक्ष घालुन मदत मिळवुन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
हे ही वाचा 2024 KTM 1390 Super Duke R चे केले अनावरण; शार्प स्टाइलसह मिळेल अधिक पॉवरफूल इंजिन,
किसान काँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात तालुका अध्यक्ष समाधान गिते, माजी सभापती अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, ॲड . प्रशांत देशमुख, आश्विन जाधव, पुरूषोत्तम हेलगे, प्रमोद कऱ्हाडे, सुरेश गुंजकर, संतोश कऱ्हाडे, संजय वाघ, प्रमोद वाघ, नामदेव सदार, किषोर भगत, रामेश्वर नेवरे, लक्ष्मण वाघ, नारायण सोळंकी, राजु उगले, सतिष मोरे, सतिश गायकवाड, रामचंद्र गायकवाड, एन. टी. भुसारी, प्रदिप वाघ, गजानन कळंगे, शांताराम गायकवाड, राहुल लव्हाळे, शेख युनूस भाई, शंकर चव्हाण, ज्ञानेश्वर कणखर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हे ही वाचा अज्ञात व्यक्तीने पेटवली सोयाबीनची सुडी
अभिनेते प्रकाश राज यांना ईडीची नोटीस; त्या १०० कोटींबद्दल होणार चौकशी