सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
कोल्हापूर येथील आरोग्य सेवकाच्या बदलीसाठी रामकिसन गंगाधर घ्यार याने पुण्याचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या नावे 3 लाख रूपयांची लाच स्विकारली. लाच स्विकारताना घ्यार ला अटक केली. परंतु उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना मात्र अद्यापही अटक केली नाही. त्यामुळे ACB प्रकरणात डॉ. भगवान पवार यांना अटक करा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा आणि आरोग्य खात्यातून बडतर्फ करा, या मागणीसाठी लोकशासन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश कोल्हे यांच्याकडून पुणे येथील आरोग्य संचालकांच्या कार्यालयासमोर 5 मार्च 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात लोकशासन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश कोल्हे यांनी म्हटले आहे की, उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी 18 आरोग्य सेवकांच्या बदल्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरच्या बदल्या रद्द करा. तसेच डॉ. भगवान पवार यांच्यावर ACB ची अपूर्ण कारवाई झाली आहे. त्यामुळे त्यांना अटक करून कारवाई पूर्ण करा. पवार हे गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ पुण्यातच कार्यरत आहेत. त्यांनी अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांना निलंबीत केले होते. तरी वरील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करून ACB कडून अपूर्ण कारवाई पूर्ण करावी, आरोग्य खात्यातून त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा तक्रारी निवेदनातून अध्यक्ष रमेश कोल्हे यांनी दिला आहे.
हे ही वाचा HIV AIDS नसतानाही निष्पाप महिलेला औषधे सुरू
जिल्हा लेखा व्यवस्थापक विजय गायकवाड, राहुल जवादे यांची सेवा समाप्त
उपसंचालकांच्या नावे 3 लाख रूपये लाच स्विकारताना आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार ला अटक





