सोलापूर : प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे सादर केला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे.
टप्पा अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळांची अनेक प्रकरणे रखडलेली आहेत, असे असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दीर्घ रजा मागितली आहे. पहिल्यांदा रजेला नकार दिल्यावर ते कामावर हजर झाले. परंतु त्यांनी रजिस्टर गहाळ प्रकरणाबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले. त्यांना टप्पा अनुदानाची प्रकरणे निकालात काढण्याबाबत सूचना दिल्यानंतर ते पुन्हा कामावर हजर होऊन रजिस्टर गहाळपकरणी पोलीसात तक्रार दिली. परंतु त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले.
हे ही वाचा Crime News | 11 वर्षाच्या मुलीवर डॉक्टरकडून रुग्णालयातच अत्याचार
टप्पा अनुदानाच्या अनेक फाईली रखडल्याबाबत वारंवार उपसंचालकांकडून पत्रे येऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. फडके रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. अंधारे यांनी आता चांगल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील बरीच कामे मार्गी लागत आहेत. परंतु फडके यांनी कामाच्या वेळी रजा काढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वारंवार सांगूनही त्यांनी सदरच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पाठविला असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण मागे, सरकारला पुन्हा दिला अल्टिमेट
नागेश चौधरींची सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित करा; चौकशी अधिकारी बोरकर यांचे सीईओंना आदेश