सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सार्वजनिक आरोग्य विभागात वेळोवेळी उत्कृष्ठ कार्य, कोरोना काळात अविरत वैद्यकीय सेवा आणि इतर सामाजिक कार्यामुळे प्रविण सोळंकी यांना वेळोवेळी केंद्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर गौरव गौरविले गेले. सध्या जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर येथे 32 वर्षांच्या प्रदीर्घ आणि अविरत आरोग्य सेवेनंतर नियत वयोमानानुसार ते आज, 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रवीण सोळंकी यांची कामगिरी नेहमीच उत्तम राहिली आहे. त्यांनी मोडनिंब, कोंडी, औराद आदी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट म्हणून चांगल्या प्रकारे रूग्णसेवा केली आहे. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा औषध भांडारचे मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणून अनेक वर्षे उत्तम सेवा बजावली. पंढरपूर आषाढी यात्रेच्या काळात आणि कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी अविरत सेवा बजावली. याची दखल घेत त्यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते “बेस्ट फार्मासिस्ट” पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच अशाच उत्तम सेवेमुळे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनीही प्रविण सोळंकी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला होता. आज अखेर ते जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर या विभागातून प्रदीर्घ सेवेनंतर ते नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. याबद्दल जिल्हा परिषद मधील विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


आरोग्य विभागातुन निवृत्त होत असलो,



