चिखली तालुका कॉग्रेसचा महावितरणला घेराव, घोषणाबाजी करीत दिले धरणे
बुलढाणा : प्रतिनिधी
विदर्भ हे सर्वाधीक विज निर्मीतीचे केंद्र असुन सुध्दा विदर्भातील शेतक-यांनाच विज पुरवठयाची चातका प्रमाणे वाट पाहवी लागत आहे, अशी खंत व्यक्त करीत चालु वर्षात पाउस हा अत्यल्प प्रमाणात झाल्याने जिल्हयात सर्वदुर दुष्काळाच्या पाशात शेतकरी अडकला आहे. अशातच महावितरण कडुन अनियमीत व अपूरा तसेच अवेळी होणारा विद्युत पुरवठा शेतक-यांचा जिव टांगणीला लावणारा ठरत आहे. रात्रीच्या अंधारात वन्यप्राण्यांच्या होणा-या हल्यांमुळे शेतक-यांचा जिव धोक्यात आला आहे. परिणामी शेतकरी वर्ग दहशतीत वावरतांना दिसत असुन येत्या काही दिवसात विद्युत विभागाने विद्युत पुरवठा पुर्णदाबाने व सुरळीत करून दयावा, अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा आमदार धिरज लिंगाडे यांनी महावितरणला दिला आहे.
हे ही वाचा एक कोटीची लाच, MIDC तील सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
चिखलीत काँग्रेसच्यावतीने महावितरण विरोधात घोषणाबाजी करीत घेराव घालुन धरणे आंदोलन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, जिल्हा कॉग्रेसचे विष्णु पाटील कुळसुंदर, पांडुरंग पाटील भुतेकर, रामभाउ जाधव, दिपक देशमाने, भाई प्रदिप अंभोरे, कुणाल बोंद्रे, अशोकराव पडघान, सचिन बोंद्रे, यांच्यासह असंख्य कॉग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निर्देशानुसार आमदार धिरज लिंगाडे यांच्या नेतृत्वात आज चिखली काँग्रेसच्यावतीने महावितरण कंपनीचे चिखली कार्यालयाला घेराव घालुन धरणे आंदोलन करण्यात आले. या घेराव आंदोलन प्रसंगी आमदार धिरज लिंगाडे यांनी आपल्या भाषणातुन शेतक-यांच्या व्यथा मांडीत विजय वितरण कपंनीचा खरपुस समाचार घेतला. अखेरीस येत्या काही दिवसात विद्युत पुरवठा दिवसा व सुरळीत न केल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी त्यांना दिला आहे. यावेळी समाधान सुपेकर, विष्णु पाटील कुळसुंदर, निलेष अंजनकर, सचिन बोंद्रे, अशोकराव पडघान यांनी शेतक-यांच्या समस्यांचा आपल्या भाषनातुन उहापोह केला.
हे ही वाचा माध्यमिक शिक्षणाधिकारी मारूती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
यावेळी विज वितरणच्या सहा. अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली तालुका व परिसरामध्ये विज वितरण कंपनीचा गलथान कारभार सुरू आहे. त्यामुळे शेतक-यांना या गलथान कारभारामुळे व विजेच्या लंपाडावामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे. रात्री बे रात्री होणारा विज पुरवठा व त्यातही अनियमीतता, भारनियमन, कमी दाबाचा विज पुरवठा, रोहित्र नादुरूस्त होणे अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधिच कमी पाउसामुळे खरीपाचे पिक हातचे गेले, आता या विजेच्या लंपाडावामुळे रब्बी पिके हातचे जाण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे सिंचनासाठी विहीरींना पाणी कमी आहे. त्या पाण्यामध्ये ओलीती करण्याची शेतक-यांना घाई झाली आहे. जिल्हामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थती निर्माण झालेली असुन पाण्यामुळे तुरीचे पिक हातचं सुकून जात आहे. शेतक-यांनी शेतामध्ये हरबराची पेरणी करून ठेवली असुन लाईन नसल्यामुळे पिक सुकून जात आहे. त्यातच आपल्या विभागाकडुन रात्रीच्या वेळी विज पुरवठा होत असल्यामुळे बिबटया, आस्वल, लांडगे यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्लयामुळे शेतक-यांचा जिव धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या विभागाकडुन विद्युत पुरवठा सुरळीत करून पुर्ण दाबाने तो करावा, खंडीत विजपुरवठा सुरू करून नादुरूस्त रोहित्र तात्काळ देण्यात यावे, वन्य प्राण्याचे हल्ले रोखण्यासाठी दिवसा विजपुरवठा दयावा, असे म्हटले आहे.
हे ही वाचा Crime News | 11 वर्षाच्या मुलीवर डॉक्टरकडून रुग्णालयातच अत्याचार
या घेराव व धरणे आंदोलनात रामदास मोरे, प्रकाष निकाळजे, आत्माराम देशमाने, प्रदिप पचेरवाल, युवक कॉग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, नासेर सौदागर, निलेश अंजनकर, अड. प्रशांत देशमुख, दिपक लहाने, गोकुळ शिंगणे, सतिश पाटील, ज्ञानेष्वर पचांगे, शरद पाटील, पुरूषोत्तम हेलगे, साहेबराव डुकरे, अजाबराव देशमुख, जिवनराव देशमुख, लिंबाबापु देशमुख, शेख जाकीर, शिवराज पाटील, डॉ. अमोल लहाने, भास्कर चांदोरे, नाजिम खासाब, डॉ. संजय घुगे, ज्ञानेष्वर पडघान, अनिल राठोड, प्रकाश राठोड, दिलीप चवरे, विजय जागृत, जितेंद्र मुळावकर सह कॉग्रेसच्या विविध सेल फ्रटंलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तथा शेतकरी बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
यावेळी राज्यातील दृष्काळजन्य परिस्थीती पाहता कायदा व सुरक्षा धोक्यात येवु नये म्हणुन कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
हे ही वाचा नागेश चौधरींची सेवा समाप्तीचे आदेश निर्गमित करा; चौकशी अधिकारी बोरकर यांचे सीईओंना आदेश