‘चिमू, पिल्लू मला माफ करा’ म्हणत लिहले भावणिक पत्र; पत्रात वरिष्ठांचीही नावे
Police Shot Himself : मूळचे सोलापूरचे परंतु सध्या नांदेड येथे पोलीस दलात कार्यरत API आनंद मळाले यांनी शनिवारी आपल्या सर्व्हिस रिव्हॉलवर मधून स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याची ह्दयद्रावक घटना सोलापूरात घडली. तसेच स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी त्यांनी “चिमू, पिल्लू मला माफ करा” म्हणत भावणिक पत्र लिहले आहे. मात्र त्या पत्रात ड्युटीवर असताना वारंवार त्रास देणाऱ्या वरिष्ठांचीही नावे असल्याने नांदेड आणि सोलापूर पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.
सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आनंद मळाले यांनी आज, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी (Police Shot Himself) झाडून घेत आत्महत्या केली आहे. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाले हे आजारी रजेवर सोलापूरला आले होते. परंतु आज पहाटे चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत असताना ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले असल्याचे दिसले. सदर घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 7 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 7 ऑक्टोबर 2023
कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याची (Police Shot Himself) माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आई असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
यापूर्वी आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले होते. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार पोलिस स्टेशन येथे सेवा बजावली होती. त्यानंतर पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.
Police Shot Himself : चिमू, पिल्लू मला माफ कर
दरम्यान मळाले यांनी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Police Shot Himself) केल्याचे त्यांनी लिहलेल्या चिट्टीवरून स्पष्ट झाले आहे. मळाले यांच्या पत्नी वंदना मळाले यांनीही नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिल्याने माझ्या पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने व्हॉटसअॅपवर भावनिक मेसेज पाठवला होता. “चिमू, पिल्लू मला माफ करा. तुमच्यासाठी मी काही एक भरीव योगदान दिले नाही. माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. माझ्या पँटच्या डाव्या खिशात चिठ्ठी आहे”, असा मेसेज API आनंद मळाले यांनी पत्नीला पाठवला होता. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा Health Minister Tanaji Sawant | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काँग्रेसकडून गाजराचा हार
Police Shot Himself : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
पत्नी वंदना मळाले यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, माझ्या पतीला वरिष्ठांकडून वारंवार खूप त्रास दिला जात होता. गुन्ह्याच्या तपासाकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होते. त्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही मळाले यांच्या पत्नीने केली आहे.
दरम्यान मयत मळाले यांच्या मृतदेहावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकारी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. अंतिम संस्कारची प्रक्रिया उस्मानाबाद (धाराशिव) या मूळ गावी होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.