सोलापूर : प्रतिनिधी
रूग्णसेवा टाळण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंनी रूग्णांना ओळखपत्र बंधनकारक केले होते. त्याशिवाय केसपेपर दिला जाणार नसल्याचा फलकच ओपीडीच्या ठिकाणी त्यांनी डकवला होता. परिणामी अनेक रूग्णांना ओळखपत्र नसल्याने उपचाराविना परत जावे लागले होते. सदरची बाब एका रूग्णाने “सत्ताकारण”च्या निदर्शनास आणून दिली. परिणामी “सत्ताकारण” न्युज नेटवर्कने यासंबंधीत बातमी प्रसिध्द करत याला वाचा फोडली. यावर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंनी सदरचा फलक तत्काळ काढून टाकला असून येथे येणाऱ्या रूग्णांना ओळखपत्राविना केसपेपर देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अखेर डॉ. सुहास मानेंचा मनमानी कारभार सध्या तरी थांबवला असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा रूग्णसेवा टाळण्यासाठी डॉ. सुहास मानेंचा नवा फतवा; ओळखपत्र असेल तरच मिळणार केसपेपर आणि उपचार
कोट्यवधी रूपये खर्चून सोलापूरातील गुरूनानक चौक येथे दोनशे बेडचे जिल्हा रूग्णालय उभारले आहे. येथे रूग्णांना औषधोपचार वेळेवर व सुलभ पध्दतीने उपलब्ध करून देणे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंचे कर्तव्य आहे. परंतु त्यांना स्वतःच्या जबाबदारीचे व कर्तव्याचे जराही भान नसून त्यांनी चक्क रूग्णांना ओळपखत्र असेल तरच केसपेपर दिला जाणार असल्याचा फतवा काढला. यामुळे अनेक रूग्णांची गैरसोय झाली होती. ओळखपत्राविना रूग्णांना परत जावे लागले. दुसरीकडे केंद्र आणि राज्य शासनाचा देशात व राज्यात कोणत्याही प्रकाराचा असा लेखी आदेश किंवा शासननिर्णय नाही. मात्र इकडे डॉ. सुहास मानेंनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे नियम लागू केला होता, जो रूग्णांच्या आरोग्याशी खेळ करणारा होता. याला जबाबदार सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर हे देखील आहेत. यांचा एका जिल्हा शल्य चिकीत्सकांवर देखील वचक नसल्याचे दिसून आले. ज्यामुळे असे बालिश उद्योग जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंकडून करण्यात आले होते. मात्र अशा मनमानी कारभार आळा बसण्यासाठी आता संचालक डॉ. नितीन अंबाडेकर हे काय कारवाई करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. सुहास मानेंवर कारवाई होणार का ?
शासकीय रूग्णालयात शासनाचा पगार घेऊन आणि रूग्णांच्या विरोधात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंनी कार्य केले आहे. सदरची बाब “सत्ताकारण”ने पुराव्यानिशी प्रसिध्द केली. त्यामुळे सदरच्या गैरप्रकारामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास मानेंवर वरिष्ठांकडून कारवाई होणार का ? असा प्रश्न जनतेकडून आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात डॉ. सुहास मानेंकडून रूग्ण आणि नागरिकांची गैरसोय
महिला व नवजात शिशु रुग्णालयात प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत