सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरकरांच्या श्रध्देचे आणि मानाचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर यात्रेसाठी शहर-जिल्हयाबरोबरच इतर जिल्हे आणि राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी येथे येणाऱ्या भाविकांसाठी होम मैदानावर मोफत भव्य आरोग्य शिबिराचे (Health Camp) आयोजन केले आहे.
सदरचे शिबिर हे 14, 15 आणि 16 जानेवारी रोजी सकाळी 11 ते रात्री 1 पर्यंत असणार आहे. या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, स्त्री रोग, त्वचा रोग, मोफत चष्मे वाटप, बालरोग तपासणी, दात, कान, नाक, घसा तपासणी, हृदयरोग तसेच इतर विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत.
हे ही वाचा App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings
सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत हे स्वतः या शिबिराच्या स्थळी सकाळपासून ठाण मांडून आहेत. त्यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले, राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते. तसेच या शिबिरात पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, मनपाच्या प्र. आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकणी आदी अधिकारी कार्यरत आहेत.
हे ही वाचा पूर्वी वादग्रस्त ठरलेले CS डॉ. सुहास माने अडचणीत येण्याची शक्यता
दरम्यान या मोफत शिबिरीबाबत अधिक माहिती देत गड्डा यात्रा पाहायला येणाऱ्या भाविकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केले आहे.
हे ही वाचा योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – Rakhi Sawant