प्रतिनिधी : पुणे
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील 10 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा शासन आदेश 17 महिन्यांपूर्वी निघाला आहे. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी गेल्या 3 दिवसांपासून राज्यभरातून सुमारे २५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती, महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनएचएम कर्मचाऱ्यांचा उद्या पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्यचे राज्य समन्वय गौरव जोशी यांनी दिली.
हे ही वाचा भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वच्छता विभागातील सचिन जाधव यांच्यावर कारवाईची मागणी
राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उद्या, 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निघेल. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषद ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढली जाईल. यात प्राथमिक आरोग्य केंद, जिल्हा रुग्णालय, पुणे, पिंपरी चिंचवड आरोग्य कार्यालये आणि पुणे येथील कुटुंबं कल्याण, TB व इतर पुणे स्थित राज्यस्तरावरील दोन हजार हून अधिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हे, परिमंडळे, मुंबई आरोग्य भवन आणि पुणे येथील आपापल्या विभागातून अधिकारी-कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. आंदोलनापूर्वी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा संघटनेने केला होता. तरी देखील लेखी आश्वासन प्राप्त न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढत शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे काय निर्णय घेणार आहेत ? याकडे NHM मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
आशा वर्कर्स् प्रकरण; आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. राखी मानेंच्या उलट चौकशीचे आदेश