सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्विकारताच डॉ. प्रकाश महानवर यांचे प्रतिपादन
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार नवनियुक्त कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर (Newly Appointed Vice Chancellor Dr. Prakash Mahanavar) यांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर) स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की, सोलापूर विद्यापीठाच्या जागतिक मानांकनासाठी सर्वांसोबत काम करणार, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रभारी कुलगुरू तथा डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडून नवनियुक्त कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर (Newly Appointed Vice Chancellor Dr. Prakash Mahanavar) यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. लक्ष्मीकांत दामा, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्यासह आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा नियमित कुलगुरूपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. राजनीश कामत यांच्याकडे कामकाज सोपविले होते. मात्र आता राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी प्रा. डॉ. महानवर यांची नियुक्ती केली आहे.
नवनियुक्त कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर (Newly Appointed Vice Chancellor Dr. Prakash Mahanavar) हे सध्या मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर ते कार्यरत होते. डॉ. महानवर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा विद्यापीठ प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी, विविध संस्था आणि संघटनातर्फे सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नूतन कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार आणि धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार. कोणतेही काम करत असताना प्रत्येक क्षेत्रात सर्वांची सोबत लागते. या बळावरच आपणास यश प्राप्त होऊ शकते. आपणही सोलापूर विद्यापीठाचा नॅक ग्रेड आणि एनआरएफ ग्रेड वाढवून जागतिक पातळीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नाव आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, डॉ. महानवर हे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास योग्य दिशा देऊन नव्या उंचीवर नक्की नेतील. (Newly Appointed Vice Chancellor Dr. Prakash Mahanavar)
हे ही वाचा Health Minister Tanaji Sawant | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काँग्रेसकडून गाजराचा हार
पालकमंत्री पदाचा तिढा सुटला; पुण्याचे पालकमंत्री अजित दादा, तर सोलापूरचे चंद्रकांत दादा