प्रतिनिधी : सोलापूर
येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला आघाडीचा निर्धार मेळावा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनीता रोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा निर्धार मेळावा शनिवार, 20 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता सलगरवाडी, डोणगाव रोड येथील न्यू हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या महिला मेळाव्याला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणाताई सलगर तसेच पक्ष निरीक्षक शेखर माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, महेश गादेकर, माजी महापौर मनोहरपंत सपाटे, जनार्दन कारमपुरी, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, तौफिक शेख, माजी उप-महापौर नाना काळे, माजी महापौर नलिनी चंदेले, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, राजन भाऊ जाधव, अजित बनसोडे, शहर सचिव चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
हे ही वाचा भाजपच्या चंद्रकांत पाटलांची वारी, काँग्रेसमधील सुशिलकुमार शिंदेंच्या घरी
व्ही. जे. एन. टी. अध्यक्ष महंमद इंडीकर, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, निशांत साळवे, युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, झोपडपट्टी सेल अध्यक्ष लक्ष्मण भोसले, ओबीसी सेल अध्यक्ष वारिस कुडले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष नूरदिन मुल्ला, मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलगर, उत्तर विधानसभा अध्यक्ष युवराज सरवदे तसेच शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, युवा- युवती कार्यकर्ते यांच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील नागरिकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष भारत जाधव, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, शहर सचिव चंद्रकांत पवार, लता डॉ. दादाराव रोटे आधी उपस्थित होते.
हे ही वाचा सिध्देश्वर यात्रेतील भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings