सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेच्या प्रभारी नगर अभियंता (Municipal City Engineer) पदी प्रथमच महिला अधिकाऱ्यास मान मिळाला आहे. या पदावर नगररचना बांधकाम परवाना विभागाच्या उपअभियंता सारिका आकुलवार यांची नियुक्ती केली आहे. तर उपअभियंता नीलकंठ मठपती यांची नगररचना बांधकाम परवाना विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तसे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांनी यांनी नुकतेच जारी केले.
हे ही वाचा जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात
सोलापूर महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगरअभियंता लक्ष्मण चलवादी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाल्याने ते 31 डिसेंबर 2023 रोजी स्वेच्छानिवृत्त झाले. दरम्यान, रिक्त झालेल्या नगर अभियंता पदासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, उपअभियंता तपन डंके, सारिका आकुलवार, निलकंठ मठपती यांच्या नावाची महापालिकेच्या वर्तुळात चर्चा होती. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लागले होते. दरम्यान महापालिका आयुक्त तथा प्रशासक शितल तेली-उगले यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत.
हे ही वाचा फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
उपअभियंता सारिका आकुलवार यांच्याकडे नगर रचना बांधकाम परवानगी विभागाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे प्रभारी नगरअभियंता म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर अकुलवार यांच्या रिक्त झालेल्या जागी सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील (जल वितरण) उपअभियंता नीलकंठ मठपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य अभियंता (जल वितरण) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील उपअभियंता व्यंकटेश चौबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हे ही वाचा ‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Truck Driver Strike | नव्या कायद्यात असं काय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावरच अडले
Malaik Arrora ला पश्चाताप? Arbaaz Khan च्या लग्नानंतर अभिनेत्री थेट म्हणाली, नकारात्मक लोकांपासून..