Maratha Reservation Protest | मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. Maratha Reservation Protest
मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरु होतं. यावेळी पोलिसांवर आंदोलकांनी गदडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातंय. संघर्षामध्ये पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी एकूण ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल करण्यात आलेत. कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. तसेच इतर गावात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. Maratha Reservation Protest
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जालन्यातील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सरकारला सुनावलंय. आंदोलकांवर गोळीबार कसा करता? ते पाकिस्तानी किंवा दहशतवादी आहेत का? असा सवाल त्यांनी सरकारला केला. यावेळी संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. तुम्ही पोलिसांच्या लाठीचार्जचे समर्थन कसे करु शकता, असं ते म्हणाले.