सोलापूरात सरकारच्या विरोधात साखळी उपोषण सुरू
सोलापूर : प्रतिनिधी
Maratha Reservation Movement : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी जाणीवपूर्वक अडवणूक करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम हे मराठा समाजातील गद्दार आहेत, असा आरोप सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच सरकारच्या विरोधात आजपासून साखळी उपोषणे सुरू केले आहे.
मनोज जरांगे-पाटील यानी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी 17 दिवस उपोषण केले. सरकारने 30 दिवसात आरक्षण देतो, असे सांगून उपोषण सोडायला लावले. सध्या सरकारने दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे यामध्ये जरांगे-पाटील यांनी सरकारला आणखीन 10 दिवस निर्णय घेण्यासाठी वाढवून दिले आहेत. ती मुदत आज, 25 ऑक्टोबरला संपते. जर सरकारने आरक्षण दिले नाही, तर पुढील आदेश येइपर्यंत मराठा समाजाचे तालुका स्तरावरील आणि जिल्हापरिषद गटातील मोठी गावे, तहसील ऑफिस समोर, जिल्हा परिषदेसमोर मराठा बांधवांनी साखळी उपोषण करावे (Maratha Reservation Movement), असा आदेश मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवली सराटी येथून जाहीर केला आहे.
त्यानुसार सकल मराठा समाज, सोलापूर शहर-जिल्हा हे जरांगे-पाटील यांना ताकत देण्यासाठी आजपासून (25 ऑक्टोंबर) पुढील आदेश येइपर्यंत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी गावपातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना (आमदार, खासदार, मंत्री) यांना गावबंदि करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना गावात कोणतेही कार्यक्रम घेवू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे हून अधिक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आल्याची माहिती यावेळभ मराठा समाज समन्वयाकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. (Maratha Reservation Movement)
हे ही वाचा K. Kavita Akka | तेलंगणात भाजपचे डिपॉझिट जप्त होणार : केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचा दावा