सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
T-Serise Marathi ने रिलीज केलेले आणि महाराष्ट्रातील प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी 8 वर्षांपूर्वी गायलेलं…
कमाल झाली, स्वप्नात आली,
राणी मुखर्जी नटी,
त्या नटीने मारली मिठी,
मला त्या नटीने मारली मिठी….
हे गाणं सध्या सोशल मिडीयावर 8 वर्षांनंतरही ट्रेंडींगमध्ये आलं आहे. त्याच गाण्याचा ट्रेंड सार्वजनिक आरोग्य विभागातील “एका जिल्हा शल्य चिकीत्सका”ने हिरीरीने फॉलो केला. परंतु यामध्ये नटीने त्या अधिकाऱ्याला मिठी मारली नाही, तर त्या बहाद्दर अधिकाऱ्यानेच सुंदर ललना कर्मचाऱ्यास मिठी मारण्याचा प्रताप केला. जो अख्ख्या जिल्हा रूग्णालयात “व्हायरल” झाला असुन येथील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…” बद्दल महिनाभरांपासुन रंगतदार चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
घडलेली घटना अशी की, सार्वजनिक आरोग्य विभागात आसाराम बापू टाईपचा एक जिल्हा शल्य चिकीत्सक पदावर विराजमान झालेला अधिकारी. जो दर गुरूवारी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन तेथे नतमस्तक होतो. भक्तीत एकदम तल्लीन. सोज्वळ मनाचा. खाली मान घालन काम एक्के काम आणि टक्केवारी एक्के टक्केवारी, बाकी जगाचं काही देणं-घेणं नाही. सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन मेडिकल बिलांच्या फाईंलींपासून ते काऊंटर सिग्नेच्यर, फिट-अनफिट सर्टिफीकेट, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट, पीसीपीएनडीटी आदी कामांचा निपटारा. मात्र देवधर्म आणि कामांच्या भक्तीत दंग असलेल्या या अधिकाऱ्याला “आसाराम बापूं”सारखे चाळे करण्याचा जणू शौकच. दुसरीकडे जिल्हा रूग्णालयात नाशिक स्थित थर्डपार्टी कंपनीतर्फे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केलेली. यामध्ये सर्वांबरोबर एका मजबुर “स्वप्ना”वत सुंदर असलेल्या महिला कर्मचारी यांचीही नेमणुक झालेली. याच महिला कर्मचाऱ्यांचे सौंदर्य बघुन या बहाद्दर अधिकाऱ्याने त्यांना थेट आपल्या निवास्थानी घरकामासाठी नेमले. नियुक्ती नाशिक स्थित कंपनीकडून जिल्हा रूग्णालयात, मात्र कामकाज घरचे. काम घरचे, आणि पगार मात्र कंपनीमार्फत शासनाच्या तिजोरीतूनच… परंतु या अधिकाऱ्याला याचे थोडीच देणेघेणे. जेवणाच्या वेळी घरी जाणे आणि सौंदर्य न्याहाळून येणे जणू दैनंदिन कार्यक्रम. एकीकडे स्वामी समर्थांची भक्ती आणि दुसरीकडे आसाराम बापूंचे अंगभर चाळे. मग काय, एके दिवशी त्या महिलेच्या “स्वप्ना”तही नसताना यांनी मारली मिठी. मग काय ? घरभर गोंधळ. गावभर चर्चा. ललनेची पोलिसांपर्यंत धाव, तर कधी पाय धरले तर कधी कामावरून काढून टाकायची भाषा. “साम, दाम आणि दंड”ची परिभाषा वापरून प्रकरण दडपण्यासाठीचा खटाटोप. दिवसा केलेल्या कांड मुळे रात्र-रात्र झोप नाही. अखेर जिल्हा रूग्णालयात त्या ललनेची नेमणुक. परंतु तोपर्यंत गावभर गोंधळ झालेला. पार्कींमध्ये राडा आणि अख्ख्या जिल्हा रूग्णालयात आनंद शिंदे यांच्या “नटीने मारली मिठी” या गाण्याच्या तालावर एकच चर्चा…
कमाल झाली, स्वप्नात आली,
राणी मुखर्जी नटी,
त्या नटीला “माने”नं मारली मिठी,
त्या “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
हे ही वाचा डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
(Disclaimer : सदरची घटना सत्य आहे. परंतु संबंधीत स्त्रिलंपट अधिकाऱ्यामुळे एखाद्या महिलेचा अनादर होऊ नये, त्यांची नाहक बदनामी होऊ नये, नाहक जिल्हा रूग्णालयाचेही नाव बदनाम होऊ नये, यासाठी शहर-जिल्हा-जिल्हा रूग्णालय आणि तो अधिकारी आदींची संपूर्ण माहिती व नावे स्पष्ट स्वरूपात देण्यात आली नाहीत. बाकी आरोग्य विभागात ज्यांना ज्या अधिकाऱ्याचे नाव या प्रकरणात आहे असे वाटते, तेच नाव शंभर टक्के खरे आहे असे समजावे, त्याची पुष्टी “सत्ताकारण”कडे करू नये. बाकी इत्यंभुत माहिती मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांना या अधिकाऱ्याचा त्रास आहे, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री मेघना बोर्डीकर किंवा सत्ताकारण चे संपादक रणजित वाघमारे यांच्याशी संपर्क साधावा…)
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा