मुंबई : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागातील “आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान” या महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार महेश आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा लेखी आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव व. पां. गायकवाड यांनी जारी केला आहे.
सध्या महेश आव्हाड यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण, मुंबई या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आहे. यापुर्वी त्यांनी हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक या महत्त्वाच्या पदावर उत्तम कामगिरी केली आहे. परिणामी नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरणाचे सीईओ म्हणून त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. त्याच बरोबर सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या पदावर कार्यरत असलेले अमगोथु श्री. रंगा नाइक यांना लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथे Mid-Career Traning Programme Phase IV (MCTP) प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्याकडून केराची टोपली
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात