सोलापूर : प्रतिनिधी
Lingayat Community Reservation : महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी मराठा समाज, धनगर समाज आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. यामध्ये आता लिंगायत समाजाचाही समावेश झाला असून लिंगायत समाजाने सरसकट आरक्षणाची मागणी करत आंदोलनाचा करण्याचा इशारा दिला आहे. तर लिंगायत महासंघाचे सहसचिव सुरेश वाले हे लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी मु. पो. वटवटे ता. मोहोळ येथून पायी पदयात्रा करत पुढे ते सोलापूर शहरातील बसवेश्वर सर्कल येथे पदयात्रेचा समारोप करुन जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाबाबत निवेदन देणार आहेत.
त्यांच्या लिंगायत आरक्षणाबरोबरच मंगळवेढा येथील प्रस्तावित महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या कामास सुरुवात करावी, लिंगायत समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करावे, वडापुर बॅरेजसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या ते सरकारकडे करणार आहेत. लिंगायत समाजातील सर्व संघटना, संस्थानी या मागण्यांसाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी वाले यांनी केले आहे.
Lingayat Community Reservation
हे ही वाचा