K. Kavita Akka | तेलंगणात भाजपचे डिपॉझिट जप्त होणार : केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचा दावा
तेलंगणात भाजपच्या सर्व जागावरील डिपॉझिट जप्त होणार, असे वक्तव्य केसीआर यांच्या कन्या K. Kavita Akka यांनी आज सोलापूरात केले आहे. तसेच केसीआर हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन दक्षिण भारतात इतिहास रचतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सोलापूर शहरात केसीआर यांच्या कन्या तथा तेलंगनाच्या आमदार K. Kavita Akka आल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात येथील पद्मशाली समाजात ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी दुपारी केसीआर कन्या कविता या ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या. माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या घरी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 105 ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेलंगणा राज्यात बीआरएस पक्ष तगडी टक्कर देईल. भाजपने लिस्ट जाहीर केली तरी बीआरएस ला काहीही फरक पडणार नाही. तेलंगाणामध्ये के. चंद्रशेखर राव गेली दोन टर्म मुख्यमंत्री झाले आहेत. आमचा बीआरएस पक्ष दक्षिण भारतात इतिहास करण्याच्या तयारीत आहे. यावेळी देखील तिसऱ्यांदा के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होतील आणि इतिहास घडवतील. भाजप असो किंवा काँग्रेस, बीआरएस पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे. टीव्हीरील नाही तर आम्ही जनतेच्या ओपिनियन पोलवर विश्वास ठेवतो, असे म्हणत के. कविता अक्का यांनी तेलंगाणा राज्यातील सत्तेवर दावा ठोकला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आमदार K. Kavita Akka सोलापूर शहरात उत्साहात साजरा केला जाणाऱ्या ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. पूर्व भागातील तेलुगु भाषिक समाजाचा आनंद उत्सव म्हणून हा सण ओळखला जातो. नवरात्र निमित्त हा उत्सव मोठ्या प्रमाणात येथे साजरा केला जातो. तेलंगणामधील महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या अष्टमी पर्यंत साजरा करतात. हळदीने गौरीदेवी बनवून निसर्गातील विविध रंगी फुले आणून त्यांचा गोपुर बनवून पारंपरिक लोकगीते म्हणत हा उत्सव साजरा करतात.