जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील कंत्राटी विधी सल्लागार ॲड. रामेश्वर माने यांनी पत्रकार रणजित वाघमारे यांच्यावर 2019 साली खंडणी आणि विनयभंगाचे 2 गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही खोट्या गुन्ह्यातून मुख्य न्यायदंडाधिकारी मा. विक्रमसिंह ई. भंडारी यांनी सर्व पुरावे, जाब-जबाब व वस्तुस्थित तपासून पत्रकार रणजित वाघमारे यांची निर्दोष मुक्तता केली. तसा लेखी आदेश 2 मे 2025 रोजी पारित केला. यात पत्रकार रणजीत वाघमारे यांच्यातर्फे ॲड. राजकुमार बाबरे यांनी काम पाहिले.
यात हकीकत अशी की, पत्रकार रणजित वाघमारे यांच्याकडून 2012 ते 2016 दरम्यान दै. सकाळ मध्ये आणि 2016 ते 2022 या कालावधीत दै. पुढारी मध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील सकारात्मक व नकारात्मक ज्या घडेल त्या बातम्या देण्याचे काम केले जात होते. यामध्ये मेडिकल बिलासाठी घेतली जाणारी टक्केवारी, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत होणारी हॉस्पिटलची लूट, PCPNDT कायद्यांर्तगत येणाऱ्या हॉस्पिटलला कायद्याचा धाक दाखवून आणि संबंधीत हॉस्पिटल विरोधात खोट्या-निनावी तक्रारी करून 5 ते 10 लाख रूपये प्रत्येक हॉस्पिटलकडून उकण्याचे काम केले जात होते. या सर्व गैरप्रकारासंदर्भात पत्रकार रणजित वाघमारे यांच्याकडून पुराव्यानिशी बातम्या प्रसिध्द केल्या जात होत्या. त्यांना तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुमेध अंदुरकर-कांबळे यांचे सहकार्य लाभले. मात्र त्यावेळच्या कंत्राटी विधी सल्लागार ॲड. रामेश्वरी माने यांनी नाहक आणि गैरसमजुतीतुन बातम्या थांबवण्यासाठी ऑक्टोबर 2019 रोजी खंडणी आणि विनयभंग असे 2 गुन्हे दाखल केले होते. त्याविरोधात जिल्हा न्यायालयात सदरचे खटले सुरू होते. यामध्ये अखेर फिर्यादी ॲड. रामेश्वरी माने यांनी स्वतःच दोन्ही गुन्ह्यात माघार घेत असून तडजोडीचा अर्ज ठेवला. परंतु न्यायाधिश मा. विक्रमसिंह भंडारी यांनी सदरचा अर्ज फेटाळून सर्व प्रत्यक्षदर्शीं, तपास अधिकारी आदींचे जाब-जबाब घेतले, पुरावे तपासले. यात सरकार पक्षातर्फे अपराध सिद्ध करण्याकरिता एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र यात साक्षीदारांच्या साक्षीमध्ये तफावत असल्याचे तसेच सदर साक्ष ही विश्वासार्हता नसल्याचे वाघमारे यांच्या वकिलाने मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. वाघमारे यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. विक्रमसिंह भंडारी यांनी सबळ पुराव्या अभावी पत्रकार रणजीत वाघमारे यांची सदरील दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. यात पत्रकार रणजित वाघमारे यांच्यातर्फे ॲड. राजकुमार बाबरे यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षातर्फे श्री. डोके यांनी काम पाहिले.
न्यायदेवतेने योग्य तोच निकाल दिला…
पत्रकार रणजित वाघमारे यांनी नेहमीच रूग्ण आणि जनतेशी संबंधीत प्रश्नांना वाचा फोडली. ॲड. रामेश्वर माने यांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्यापूर्वी एकही बातमी प्रसिध्द केली गेली नव्हती. मात्र त्यांनी नाहक गुन्हे दाखल केले. परंतु न्यायदेवतेने सर्व पुराव्याअंती योग्य तोच निकाल दिला आहे.
– डॉ. सुमेध अंदुरकर-कांबळे, तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक, सोलापूर.