सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पद भरती प्रकरणातील उमेदवारांकडे ना पात्रता, ना ही महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, तरीही सदरची भरती प्रक्रीया पार पडली. हा गैरप्रकार वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी वर्षभरापूर्वी निदर्शनास आणून दिला. त्यानंतरही सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांच्याकडून गेल्या वर्षभरापासून कोणतीही भुमिका घेतली गेली नाही, ना ही कोणतीही कारवाई करण्यात आली. त्यामुळे बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ असल्याचे स्पष्ट झाले असुन त्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांवर उघड-उघड अन्याय केला जात असल्याचेही दिसून येत आहे.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
शरत शेट्टी यांनी सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांना 27 जानेवारी 2025 रोजी सदरच्या गैरप्रकाराबाबत लेखी निवेदन दिले होते. यामध्ये म्हटले आहे की, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयाने प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांची पात्रता नसताना पदभरती केली आहे. अनेक उमेदवारांकडे महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र नाही. तसेच काही उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या उमेदवारांना शासन सेवेत सामावून कसे घेतले ? याला सहसंचालक कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी जबाबदार आहेत. परंतु वर्षभरापासून याचा पाठपुरावा करून देखील डॉ. संदीप सांगळे यांच्याकडून या बोगस भरतीप्रक्रियेवर पांघरून घातले जात आहे. ते त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी सदरच्या भरतीमधील खोटी प्रमाणपत्रे सादर केलेल्या उमेदवारांच्या नेमणुका त्वरीत रद्द करून प्रतिक्षा यादीवर जे खरोखरच पात्र उमेदवार आहेत, त्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी लेखी मागणी शरत शेट्टी यांनी केली आहे. याबाबत सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
हे ही वाचा डॉ. संतोष नवले, मशाक मुजावर चौकशीच्या फेऱ्यात
उपसंचालकांच्या नावे 3 लाख रूपये लाच स्विकारताना आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार ला अटक




