Jalna News | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सराटी आंतरवाली, जालना येथील गावकरी बेमुदत आमरण उपोषणास बसलेले होते. सदरचे आंदोलन संवैधानिक पध्दतीने सुरू असताना पोलिसांनी बळाचा गैरवापर करून आंदोलक महिला-पुरुषांसह आबाल-वृध्दावर लाठीचार्ज आणि गोळीबारही केला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावा संघटनेने सोमवारी चक्का जाम आंदोलन केले.
सदरच्या घटनेत पोलिसांनी केल्यामुळे 15 ते 20 आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली व दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांचेवतीने 4 सप्टेंबर 2023 रोजी तेरा मैल, सोलापूर-विजापूर हायवे, दक्षिण सोलापूर येथे रास्ता चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक पुर्णूपणे विस्कळीत झाली होती. Jalna News
जालना पोलिसांनी निष्पाप लोकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रोष उत्पन्न होवून राज्यातील सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार केल्याप्रकरणी जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तातडीने निलंबित करून या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करावी. मराठा महिलाच्या अंगावर हात टाकून, त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी SP तुषार दोषी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावेत. Jalna News
मराठा जातीला कुणबी तत्सम जात घोषित करून सरसकट मराठा जातीचा राज्य ओबीसी यादीत समावेश करावा. या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांचे अध्यक्षतेखाली 04 सप्टेंबर 2023 रोजी, तेरा मैल, सोलापूर-विजापूर हायवे, दक्षिण सोलापूर येथे रास्ता चक्का जाम आंदोलन करण्यात आले. Jalna News
या आंदोलनात छावा संघटनेचे योगेश पवार, गणेश मोरे, रतिकांत पाटील, विश्वजित चुंगे, विजय ढेपे, बबू शेख, विशाल चव्हाण, सचिन साठे, बाबासाहेब आंबूळे, आण्णा चव्हाण, बंडू पुजारी, सुबान तांबोळी, समर्थ गुंड, पिंटू माने, मराठा समाजातील बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. तर या आंदोलनाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून सक्रिय पाठींबा दिला. Jalna News