सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले मंजूर करून देण्यासाठी शिक्षण खात्यातीलच शिक्षक बाबुराव पाटील आणि भिमाशंकर भोई कार्यरत आहेत. यांच्याकडून शिक्षकांच्या मेडिकल बिलासाठी सिव्हील सर्जन यांच्या नावे टक्केवारी वसुली सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मेडिकल बिलासाठी टक्केवारी घेणारे शिक्षक बाबुराव पाटील, भिमाशंकर भोई यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी लेखी तक्रारी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि CEO कुलदिप जंगम यांच्याकडे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
लेखी तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले ही सोलापूर सिव्हील सर्जन कार्यालयातून मंजुर-नामंजुर होऊन मिळतात. यासाठी ओंकार क्रीडा व शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ, सोलापूर संचलित “ओंकार मराठी प्राथमिक प्रशाला, म्हेत्रे नगर, सोलापूर येथील शिक्षक बाबुराव पाटील आणि शिक्षक भिमाशंकर भोई हे टक्केवारी घेऊन सदरची बिले मंजुर करून देतात. यासाठी येथील सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने हेच टक्केवारी घेऊन बिले मंजुर करून घेत असल्याचे हे दोघे दाखवत आहेत. मात्र मेडिकल बिले सादर करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर इतर सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून मेडिकल बिलासाठी शिक्षक बाबुराव पाटील आणि भिमाशंकर भोई हे टक्केवारी वसुल करत आहेत. त्यामुळे सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने, शिक्षक बाबुराव पाटील आणि शिक्षक भिमाशंकर भोई या सर्वांचे एकमेकांसोबतचे कॉलरेकॉर्डंग, सोशल मिडीयावरील चॅट, या सर्वांचे मोबाईल टॉवर लोकेशन आणि संभाषण हे फॉरेन्सिक लॅब मार्फत तपासावे.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
दुसरीकडे शिक्षक बाबुराव पाटील यांच्याकडून मेडिकल बिलांच्या टक्केवारीसाठी केल्या जाणाऱ्या कामामुळे ते शाळेतील विद्यार्थ्यांना अजिबात शिकवत नाहीत. शाळेत फक्त हजेरी लावण्यासाठी ते येतात. त्यानंतर ते लगेच निघून जातात. त्यामुळे ओंकार मराठी प्राथमिक प्रशाला येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेही जाब-जबाब इनकॅमेरा घ्यावेत. त्यामुळे याची सत्यता आणखी दिसून येईल. दुसरीकडे या शाळेचे मुख्याध्यापक गुरव यांच्याकडूनही त्यांना का सुट दिली जाते. शाळेच्या वेळेत शाळेत का थांबवून घेतले जात नाही. विद्यार्थ्यांना शिकवणे का बंधनकारक केले जात नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमल्यास त्यांनी बाबुराव पाटील यांना विद्यार्थ्यांना शिकवून दाखवावे. त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षणही देता येत नाही, त्यामुळे दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आयुष्यभराचे नुकसान होत आहे. तसेच शासनाचा फुकटचा पगार ही बाबुराव पाटील यांना जात आहे आहे. त्यामुळे या सर्व वरिल मुद्द्यांनुसारही बाबुराव पाटील, भिमाशंकर भोई यांची चौकशी करून कारवाई करावी.
हे ही वाचा आशा वर्कर्स् प्रकरण; आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. राखी मानेंच्या उलट चौकशीचे आदेश
शिक्षक बाबुराव पाटील आणि शिक्षक भिमाशंकर भोई यांची संपत्तीही तपासावी. कारण बाबुराव पाटील आणि भिमाशंकर भोई यांच्याकडून टक्केवारी मिळाल्याशिवाय बिले मंजुर करून दिली जात नाहीत. टक्केवारी न मिळाल्यास बिले नामंजुर केली जातात. परंतु ना मंजुर बिलासाठी टक्केवारी दिल्यास, पुन्हा तीच नामंजुर बिले परत मंजुर करून दिली जातात. पाटील आणि भोई यांच्याकडून रेग्युलर मेडिकल बिलासाठी 10 टक्के तर नामंजुर बिलांसाठी 15 टक्के रक्कम घेतली जाते. टक्केवारी वसुलीचा हा प्रकार जवळपास गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत शिक्षण खात्यातून मंजूर झालेल्या सर्व बिलांच्या मंजुर ऑर्डर व त्या मंजुर बिलाचे ऑर्डर धारक असलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर इतर सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे इनकॅमेरा जाब-जबाब नोंदवावे. जेणेकरून सदरचा टक्केवारी वसुलीचा गंभीर प्रकार उजेडात येईल. येथे सादर केलेल्या मेडिकल बिलासांठीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर येईल. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्याकडून शासन स्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमावी. या चौकशी समितीव्दारे वरील मुद्द्यांनुसार इनकॅमेरा चौकशी करावी, चौकशीअंती संबंधीत सर्वांना निलंबीत आणि नंतर बडतर्फ करावे, अशी लेखी तक्रारीत मागणी केली आहे. तसेच येत्या काही दिवसांत सदरच्या गैरप्रकाराविरोधात पूनम गेट, जिल्हा परिषद, सोलापूर येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सदरच्या निवदेनात म्हटले आहे.
हे ही वाचा DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा