सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरतीवेळी सेवा प्रवेश नियमाला केराची टोपली दाखवली आहे. 600 उमेदवारांपेक्षा जास्त पदांची बेकायदेशिर पदभरती सहसंचालक, आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग व जलजन्यरोग पुणे ६ या कार्यालयाने केलेली आहे. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या बोगस भरतीत समील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करा, अशी लेखी तक्रार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या बोगस भरती प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे दाखल
या लेखी तक्रारीमध्ये शेट्टी यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट पॅरा मेडिकल कौन्सिल परिषद मुंबई यांच्याकडून पॅरा मेडिकल नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या उमेदवारांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट पॅरा मेडिकल कौन्सिल परिषद मुंबई यांच्याकडून 12 वी पास नंतर डी.एम.एल.टी केलेले उमेदवार आहेत, अशा उमेदवारांना सुध्दा नेमणुकीचे आदेश दिले आहेत. काही उमेदवारांनी महाराष्ट पॅरा मेडिकल कौन्सिल परिषद मुंबई यांच्याकडे नोंदणी केलेली नाही, अशा उमेदवारांना नेमणुकीचे आदेश दिलेले आहेत. तर काही उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही diploma in operation theator आहे, अशा उमेदवारांनासुध्दा नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पॅरा मेडिकल कौन्सिल परिषद मुंबई यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत कार्यालयास सादर केले नाही, अशा उमेदवारांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत, असे सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग जलजन्यरोग कार्यालयाचे दिनांक 3/4/2025 चे पत्रान्वये कळविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पॅरा मेडिकल कौन्सिल परिषद मुंबई यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयास दिलेले नाही, असे उमेदवार सध्या कार्यरत आहेत. सदरच्या प्रकरणावर चुकीची माहिती देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे ही वाचा पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सक्षम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
तरी या संपूर्ण भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, या भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांवर शासनाची फसवणुक केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि जे प्रतिक्षा यादीतील वंचित उमेदवार आहेत, ज्यांनी पदवीत्तर पदविका धारण केलेली आहे, अशा उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी शरत रामण्णा शेट्टी यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि आयुक्त यांच्याकडे केली आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची बोगस भरती केल्याने खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे यातील अधिकारी, कर्मचारी आणि खोटी कागदपत्रे सादर करणारे उमेदवार या सर्वांवर गुन्हे दाखल व्हावेत. – शरत रामण्णा शेट्टी.
हे ही वाचा 11 हजारहून अधिक मुलांवर मोफत ह्दयरोग व इतर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न
सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला 500 कोटींचा निधी मंजुर





