सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र, सोलापूर येथील कार्यालयात कार्यरत मुल्यमापन व सहनियंत्रण सहायक दिनेश राठोड यांचा मनमानी कारभार सुरू आहे. राठोड हे आपले स्वतःचे कामकाज तालुक्यामध्ये कार्यरत कर्मचार्ऱ्यांकडून करून घेतात व त्याची नोद स्वतः काम केली अशी दाखवून वरिष्ठ कार्यालायची फसवणूक करतात. वरिष्ठ कार्यालाकडून प्रतिनियुक्ती न काढण्याबाबतचे स्पष्ट आदेश असताना त्यांनी माढा व करमाळा येथील समुपदेशक यांची जिल्हास्तरावर प्रतिनियुक्ती दिली आहे. यामुळे करमाळा येथील कामकाज कमी झाले आहे. त्यामुळे करमाळा येथील मागील 3 वर्षापासूनची चोकशी करण्यात यावी. link ARTऔषध उपचार व ICTC यांची पण कसून चौकशी करण्यात यावी. कारण सदरचे समुपदेशक हे सोलापूर येथे राहत असून दिनेश राठोड हे त्यांचा गैरफायदा घेत आहेत. त्यांच्याकडून राठोड हे स्वतःचे सर्व काम करून घेत असून स्वत:ची जबाबदारी पार पाडीत नाहीत. तसेच ते प्रतिनियुक्तीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासही देतात. ते LLb व LMM चे शिक्षण कार्यालयाच्या वेळेत वरिष्ठ कार्यालाची परवानगी न घेता शासनाची फसवणूक करून घेत आहेत. तरी त्यांनी मागील 5 वर्षात घेतलेल्या डिग्री ची चौकशी करावी. त्यामुळे दिनेश राठोड यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडे राजदिप गायकवाड यांनी केली आहे.
हे ही वाचा जिल्हा लेखा व्यवस्थापक विजय गायकवाड, राहुल जवादे यांची सेवा समाप्त
राजदिप गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दिनेश राठोड हे MSACS IEC मार्फत आलेला फंड FPI संस्थेच्या स्टाफला देऊन बोगस IEC Activity दाखवीत आहेत. DAPCU साठी आलेला कार्यक्रम हा DAPCU कार्यालयाची जबाबदारी असताना ते दुसऱ्या संस्थेवर सोपून सदर प्रकरणी शासनाची दिशाभूल करीत आहेत. करमाळा आयसीटीसी काऊन्सलर यांचे IEC ऍक्टिव्हिटी कार्यक्रमसाठी चुकीच्या पध्दतीने गेल्या 4 महिन्यांपासून प्रतिनियुक्ती काढली आहे. अधिकार नसताना मोबाईल व्हॅन टेक्निशियन सोमनाथ केगावकर यांना वॉकिंग कुलरचे सर्व रेकॉर्ड करणे, किट वाटप करणे हे काम त्यांनी सोपवले आहे. मोबाईल व्हॅन ड्रायव्हर दरेकर यांना फायनान्सचे सर्व पीएफएमएस मारणे, अकाउंटचे सर्व कामकाज पाहणे हे काम सोपवण्यात आले आहे. मोबाईल व्हॅन क्लीनर यांना कॅम्पला न पाठवता सर्व झेरॉक्स काढणे आदी कामे सोपविली आहेत.
हे ही वाचा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार
पुढे तक्रारीत म्हटले आहे, एनजीओने कॅम्प अरेंज केल्यानंतर मोबाईल व्हॅनची मागणी असताना त्यांना मोबाईल व्हॅन न देणे, मोबाईल व्हॅन काऊन्सलर टेक्निशियन यांना तसेच ड्रायव्हर-क्लीनर यांना कीट वाटपाचे काम लावणे, या बाबत NGO तक्रार करीत आहेत. तसेच पांगरी येथील समुपदेश यांनाही कार्यालीन कामकाजसाठी वारंवार DAPCU येथील कार्यालयात बोलावले जात आहे. तसेच IEC Activity साठी आलेल्या फंड मध्ये गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे. दिनीश राठोड हे दुपारी १२ ते ४ कार्यालयात न थाबता वैयक्तीक बाहेरील कामे वारंवार करीत फीरत असतात.
तसेच संतोष दगडू थोरात हे मुरूम येथून बदलून सोलापूर येथे कार्यरत आहेत. सदर समुपदेशक आलेल्या दिवसांपासून आज तागायत दारू पिऊन दिनेश राठोड याच्याशी दिवसभर गपा मारत बसतो. कोटेशन शिवाय DAPCU Montlhy मीटिंग साठी आलेल्या 18 हजार रूपये अनुदानातून मीटिंग साठी खर्च न करता वैयक्तीक खर्च केले जातात. तरी बिले, पावती व हॉटेल मधील रजिस्टरची पाहणी करणायत यावी, जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल. दुसरीकडे 4 Auditor असतात परंतु जेवणाची 11 ते 15 लोक जेवण केल्याची खोटी बिले सादर करतात. यासाठी हॉटेल अजिंक्यचे बिल पाहणे. तसेच दिनेश राठोड यांचे TA व MOVMENT तपसणी करून चौकशी करणायत यावी. SV Compute आणि सत्यम Entrprizes हे एकाच व्यक्तीचे आहेत. Account Holder ही एकच व्यक्ती आहे. वेगवेगळे भास्कर प्रिंटर व वसुंधरा स्क्रीन हे दोन्ही एकाच व्यक्तीच्या नावाने दोन लेटर हेड तयार करून त्या व्यक्तीच्या नावाने पैसे काढून शासणाची दिशाभुल करून अनुदानमध्ये गैरव्यवहार केला आहे. तरी वरील सर्व तक्रारी मुद्द्यांची चौकशी करावी आणि चौकशी अंती दिनेश राठोड यांची सेवासमाप्ती करावी, अशी लेखी तक्रार राजदिप गायकवाड यांनी प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा निलंबीत आरोग्यसेवक रामकिसन घ्यारची वारी, MMIT च्या दारी…




