पुणे : प्रतिनिधी
पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी विभागातील NHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांपासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सकांना नोटीसा देण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, सोलापूर मधील सिव्हील सर्जनसह 7 जणांना उपसंचालक कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या पत्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून केराची टोपली
घडलेली घटना अशी की, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या कार्यालयातील 4 सदस्यिय तपासणी पथकाने 11 ते 13 डिसेंबर 2023 रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान या पथकास “अत्यंत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी, मोठ्या प्रमाणात वित्तीय अनियमितता आणि शासनाच्या तरतुदीचा भंग केल्याचे आढळून आल्या आहेत.” त्यामुळे या तपासणी अहवालावर अभिप्राय देण्यासाठी तसेच या विषयक सुनावणीसाठी 26 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या दालनात सिव्हील सर्जनसह 7 जणांना हजार राहण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदिप ढेले, डॉ. धनंजय पाटील आणि सध्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक विष्णू पाटील, अधिपरिचारीका वहिदा शेख, कनिष्ठ लिपीक युसूफखान पठाण, सहाय्यक अधिक्षक मनिषा नागेश बंदपट्टे, सांखिकी अन्वेषक सचिन काकडे आणि औषध निर्माता पी. व्ही. जामगांवकर यांचा समावेश आहे.
हे ही वाचा आकुडे यांचे बांधकामात दुर्लक्ष, उपसंचालकांनी दिली नोटीस अन नाकारला खुलासा
लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल डॉ. पिंपळेंना बडतर्फ करा
काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयास सादर करा