India Canada Visa | कॅनडा भारत सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे भारताने कॅनडा येथील व्हिसा सेवा बंद केली आहे.
भारत सरकारने वेबसाईटवर माहिती दिली की, “तांत्रिक कारणामुळे 21 सप्टेंबर 2023 पासून पुढील सूचना येपर्यंत भारतीय व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली आहे. कृपया अधिक माहितीसाठी BLS च्या वेबसाईटला भेट द्या.”
भारत आणि कॅनडा दरम्यान गेल्या काही कालावधी पासून वाद निर्माण झाला आहे. कॅनडाने भारताच्या उच्चायुक्तांना तिथून बडतर्फ केले आहे. पुढे भारतानेही कॅनडाच्या उच्चायुक्तांना बडतर्फ केले. परिणामी भारत सरकारने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ‘अॅडव्हायजरी’ (सूचनावली) प्रसिद्ध केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.India Canada Visa