सोलापूर : प्रतिनिधी
अखेर गुरूनानक चौक येथील दोनशे बेडचे महिला व नवजात शिशु रूग्णालय रूग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant ) यांच्या हस्ते उद्या, 13 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जवळपास साडेतीन हजार कोटी रूपये खर्च करून महिला व नवजात शिशु आणि जिल्हा रूग्णालयाची उभारणी केली आहे. तर जवळपास 1 हजार चौरस मीटर या हॉस्पिटलचे क्षेत्रफळ आहे. 20 फेब्रुवारी 2019 रोजी सदरच्या हॉस्पिटलला मान्यता मिळून याचे कामकाज त्याच वेळी सुरू झाले. यामध्ये 100 खाटा या महिलांसाठी तर 100 खाटा या नवजात शिशु साठी असे मिळून दोनशे बेडचे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. यासाठी आवश्यक अशी सर्व कायम आणि कंत्राटी पध्दतीने पदे भरण्यात आली आहेत.
हे ही वाचा आई असो वा आयएएस अधिकारी सर्वांना संघर्ष करावाच लागतो
शिक्षक भरतीमध्ये खासगी संस्थेत मुलाखतीसह एका जागेसाठी दहा उमेदवरांना संधी
काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयास सादर करा