सोलापूर : प्रतिनिधी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्ह्यातील सर्व खासदार-आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे सर्व कार्यक्रम यापुढेही तितक्याच प्रभावीपणे राबवू, असे मत नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद (IAS Collector Kumar Aashirwad) यांनी व्यक्त केले.
सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS Collector Kumar Aashirwad यांची नियुक्ती झाली. त्यानंतर शनिवारी सकाळी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी शंभरकर यांनी स्वतः नवनियुक्त IAS Collector Kumar Aashirwad यांना हाताशी धरून खुर्चीवर बसवत त्यांचे स्वागत केले.
सुरवातीला नूतन जिल्हाधिकारी आशिर्वाद यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होताच निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पदभार देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्यालयातील सर्वच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले श्री. सिध्देश्वरांचे दर्शन
नूतन IAS Collector Kumar Aashirwad यांनी ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर मंदिरात जाऊन श्री. सिध्देश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा
Plane Crash | मुंबईत धावपट्टीवर विमान कोसळले
Maratha Reservation Meeting | जरांगे-पाटील सोलापूर जिल्ह्यात घेणार ५ जाहीर सभा