सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेत नवनियुक्त आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी नुकताच पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी रूग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी महापालिकेतील नागरी आरोग्य केंद्रांना भेटी दिली. यावेळी रामवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद आणि इतर ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिका नसल्याने उपचारास आलेले रूग्ण थांबून असल्याचे दिसून आले. यावेळी नवनियुक्त आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी संबंधीत रूग्णांची स्वतः तपासणी आणि औषधोपचार केले.
सोलापूर महापालिकेला अखेर पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळाला आहे. यापूर्वी सदरचा पदभार डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्याकडे होता. डॉ. माने यांनी 8 जून 2024 रोजी पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. माने यांनी विविध नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या. रूग्णांवर उपचारासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान काही नागरी आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि परिचारीका या कर्तव्यावर अनुपस्थित आढळल्या. त्यामुळे त्यांच्यावर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत एक डॉक्टर व एका परिचारिकेचे एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई केली आहे. यावेळी डॉ. माने यांनी रामवाडी येथील रामवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीनगर परिसरातील दाराशा प्रसूतिगृह, नई जिंदगी आणि काळी मज्जिद येथील आरोग्य केंद्रास भेटी दिल्या.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यानंतर तेथील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कामाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. माने यांनी कर्तव्यावर असताना कामात निष्काळजीपणा करताना आढळल्यास यापुढे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या चष्म्यांचे सोलापूरातील आरोग्य शिबिरात वाटप
सोलापूर विभागात मनमानी कारभारातून एसटी महामंडळाची आर्थिक लूट