सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त आणि संचालकांपेक्षाही आपण खुपच जास्त, प्रामाणिक आणि अहोरात्र काम करत असल्याचा दिखावा पुण्याचे उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून सध्या सुरू आहे. परिणामी पुण्यातील ACB प्रकरणात आणि फलटणमधील खंडणीच्या गुन्ह्यात असे दोन्ह गुन्ह्यातील FIR मध्ये नाव असूनही त्यांच्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या निलंबनाबाबत कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारले असता, सदरचे प्रकार चुकीचे आहेत. लवकरच कारवाई केली जाईल, असे म्हणत पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या निलंबनाचे संकेत दिले आहेत. मात्र दुसरीकडे चुकीचे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबीत करणाऱ्या आरोग्य मंत्री महोदयांकडून अद्याप पर्यंत कारवाई न केल्याने डॉ. भगवान पवारांचे निलंबन दूरच, वरून दोन्ही गुन्ह्यात नावे आल्याने बक्षीस म्हणून कारवाई ऐवजी “जॉईंट डायरेक्टर” पद बहाल करणार आहेत का ? नसेल तर DPC घोषीत करून “उपसंचालक” केडर बहाल करणार आहेत की थेट डॉ. नितीन अंबाडेकरांच्या जागी बसवणार आहे ? हे येत्या काळात कळणार आहे.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पुणे उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच “माझं गांव, आरोग्य संपन्न गांव” विभागीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयातील VIP कक्षात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत “सत्ताकारण”चे संपादक रणजित वाघमारे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला की, आपण मनिषा विखे यांना निलंबीत केले, हुमणे यांना निलंबीत केले, मिनाक्षी बनसोडे यांना निलंबीत केले, अशोक थोरात यांना निलंबीत, परंतु डॉ. भगवान पवार यांची पुणे ACB प्रकरण आणि फलटण मधील खंडणी प्रकरण, अशा दोन-दोन FIR मध्ये नावे आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन कधी ? किंवा आपणावर कोणाचा दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोणाचाही दबाव नाही. जो चुकीचा असेल, तो आरोग्य विभागात चालणारच नाही. हे आगोदरपासून सांगितले आहे. वस्तुस्थिती बघून लगेच कारवाई केली जाईल.
हे ही वाचा ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसुन व्यापक लोकचळवळ बनावी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
प्रकाश आबिटकर यांनी डिसेंबर 2024 पासुन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यापासून आरोग्य सेवा आणि आरोग्य यंत्रणांचा स्तर खुप उंचावला आहे. वर्षभरातच आरोग्य विभागाला एक नावलौकीक प्राप्त करून दिला आहे. चुकीचा संचालक असो की उपसंचालक, जिल्हा शल्य चिकीत्सक असो की जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असो की कंत्राटी कर्मचारी, या सर्वांना चांगल्या कामाची थाप म्हणून बक्षीस वितरण समारंभात गौरव आणि चुकीचे असेल तर निलंबनाची कारवाई केली आहे. याचाच एक भाग म्हणजे, अलिबाग, जि. रायगडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, सोलापूरच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, नागपुरातील प्रादेशिक मनोरूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश तुळशीराम हुमणे, साताराचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. युवराज करपे, बिडचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, स्त्री रोग तज्ञ डॉ. सि. एम. शिकलगार आदींचे निलंबन केले आहे. परंतु पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची दोन-दोन गुन्ह्यात नावे असुनही अद्याप पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निलंबन तर दूर, चौकशी दरम्यान साधे पदावरून दूरही केले नाही.
हे ही वाचा HIV AIDS नसतानाही निष्पाप महिलेला औषधे सुरू
2 जानेवारी 2026 रोजी पुणे ACB प्रकरणात 3 लाख रूपये घेताना आरोग्य सेवक रामकिसन घ्यार ला अटक केली. ज्यामध्ये गुन्हा नोंद झाला असुन त्या गुन्ह्याच्या FIR मध्ये उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचे नाव आहे. त्यानंतर पंधरा दिवसातच 18 जानेवारी 2026 रोजी फलटण येथे खंडणीचा दुसरा गुन्हा नोंद झाला, त्याही गुन्ह्याच्या FIR मध्ये रामकिसन घ्यार आणि डॉ. भगवान पवारांचे नाव आहे. दोन्ही गुन्ह्यातील FIR मध्ये नाव येऊनही उपसंचालक डॉ. भगवान पवार यांचे निलंबन केले नाही. यावेळी मात्र कर्तव्यदक्ष अशा आरोग्य मंत्र्यांकडून अद्यापही कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. याबाबतीत मात्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भुमिकेवर, यापूर्वी केलेल्या उत्तम कार्यावर खुद्द सार्वजनिक आरोग्य विभागातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आतातरी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार की, गुन्ह्यात नावे आल्याने बक्षीस म्हणून “जॉईंट डायरेक्टर” पद बहाल करणार आहेत का ? नसेल तर DPC घोषीत करून “उपसंचालक” केडर बहाल करणार आहेत की थेट डॉ. नितीन अंबाडेकरांच्या जागी बसवणार आहे ? हे येत्या काळात कळणार आहे.
हे ही वाचा ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू
डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर




