सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
काही दिवसांपूर्वी “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ने “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…” च्या माध्यमातून आसाराम बापू टाईपच्या एका जिल्हा शल्य चिकीत्सकाने ललना कर्मचाऱ्सास मिठी मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आणला. परिणामी आरोग्य मंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याची सदरच्या पदावरून तत्काळ इतरत्र बदली केली. मात्र बदलीनंतरही स्त्रीलंपटपणाचा शौकीन असलेल्या त्या अधिकाऱ्याची चर्चा थांबता थांबेना. बदलीनंतरही “मानें”नं नटीला मारली मिठ्ठी अन् आरोग्यमंत्र्यांनी “माने”ची केली सुट्टी… अशी चर्चा अख्ख्या जिल्हा रूग्णालयात आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात पुन्हा रंगली आहे.
थोडक्यात T-Serise Marathi ने रिलीज केलेले आणि महाराष्ट्रातील प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी 8 वर्षांपूर्वी गायलेलं…
कमाल झाली, स्वप्नात आली,
राणी मुखर्जी नटी,
त्या नटीने मारली मिठी,
मला त्या नटीने मारली मिठी….
या गाण्याच्या ताल अन् सुरामध्ये
“स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
“मानें”नं नटीला मारली मिठ्ठी
अन् आरोग्यमंत्र्यांनी “माने”ची केली सुट्टी…
हे गीत चेष्ठेने आणि कुत्सीतपणे गायले जात आहे. मनमानी करणारा माने टिंगल-टवाळीचा विषय ठरला आहे. त्यांची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. त्यांनी स्वतःच्या इज्जतीचा तरी यापुढे विचार करावा आणि तशी वर्तणुक ठेवावी, इशी चर्चा कंत्राटी कर्मचारी देखील करू लागले आहेत.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…