Good News For Alcoholics : शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार मद्यविक्रीसाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी वाइन शॉप सुरू ठेवण्यासस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मद्यपिंना रात्री उशिरा पर्यंत मद्यपान करता येणार आहे. डिसेंबर अखेर 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी हे नियम लागू आहेत.
यामध्ये अनुज्ञप्त्ती प्रकार एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्री चे दुकान) साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 शिथिल करावयाचा कालावधी रात्री 10.30 ते दुसऱ्यादिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल 2 अनुज्ञप्ती साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करण्याचा कालावधी रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार एफएलडब्ल्यू 2 साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 शिथिल करावयाचा कालावधी रात्री 10.30 ते दुसऱ्यादिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार एफएल बीआर 2 साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करावयाचा कालावधी रात्री 10.30 ते दुसऱ्यादिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार एफएल 3 (परवाना कक्ष) साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करावयाचा कालावधी पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रा व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार एफएल 4 क्लब अनुज्ञप्ती साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करावयाचा कालावधी पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रा व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार नमुना ई (बिअर बार) साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करावयाचा कालावधी रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजे पर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार – ई 2 साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करावयाचा कालावधी रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आहे.
अनुज्ञप्ती प्रकार – सी एल 3 साठी दि. 24, 25 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी शिथिल करावयाचा कालावधी महानगरपालिका तसेच अ व ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्त्यांसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी 1 वाजे पर्यंत आहे, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी दिले आहेत.