रणजित वाघमारे
अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही, तर ही एक माणुसकीची चळवळ आहे. प्रत्येकाने अवयवदान चळवळीचा भाग बना. मृत्यूनंतरही दुसऱ्यांना जीवनदान द्या, असे आवाहन अवयवदान चळवळीनिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवडा आयोजित केला आहे. या अवयवदान मोहिमेत सर्वांनी सामील व्हावे, अवयवदान चळवळ उभी करावी, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी स्वतः अवयवदान करण्यासंदर्भातील स्वतःचा फॉर्म भरला आहे.