Ganpati Chaturthi 2023 | कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ते कार्य निर्विघ्न पार पडावे, यासाठी विघ्नहर्त्या श्रीगजानाचे स्मरण, पूजन केले जाते. सर्व शुभ कार्यात प्रथम ‘निर्विता सिद्धार्थम्’ म्हणून ज्ञानाचेच स्मरण केले जाते. परंतु श्रीगणेशाची प्रतिष्ठापना कधी करावी? माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया.
अनेक घराच्या मुख्यदारावर गणरायाची मूर्ती किंवा चित्र असते. शिक्षणाला प्रारंभ होतो तो ‘श्रीगणेशायनमः’ करून. आजही गणेशाचे उपासक जगभर आहेत. गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. तो आता भारताबरोबरच जगभर साजरा केला जातो आहे. अशी गणरायाची ख्याती आहे. Ganpati Chaturthi 2023
‘अविर्भूतंच सृष्ट्यादौ’ असे अथर्वशीर्षात म्हटले आहे. असा हा सृष्ट आरंभापासून पूजला जाणार आहे. प्रिय पक्षा विश्ववंद्य ज्ञान आहे. अशा या गणेशाचा उत्सव, आपला आवडता गणेशोत्सव आता आला आहे. भातृपद शुद्धतुर्थी या दिवशी श्रीगणेश चतुर्थी (ता. १९) असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळ या दिवशी सार्वजनिक गणेशाची स्थापना व पूजन केले जाते. Ganpati Chaturthi 2023
या दिवशी सूर्योदयापासून १:४४ पर्यंत भद्रा आहे. तसेच दिवसभर वैधृति योग आहे ज्याने गणेश आपण ‘सुमुहूर्तमस्तु’ आहे, अर्थात तू स्वतःच एक सुमुहूर्त आहे असे आवाहन करतो म्हणून आपण श्रीगणेशच्या स्थापनेसाठी भद्रा दोष किंवा इतर दोष मानू नयेत. त्यामुळे आपल्या आणि गुरुजींच्या सोईने कोणत्याही ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्रीगणेशाची स्थापना करून पूजन करता येईल.
अशी असावी घरगुती मूर्ती
गणेश मूर्ती सजविल्या गेलेल्या पाटावर किंवा चौरंगावर अक्षता मध्ये ठेवावी. ठेवताना तोंडाचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे अधिक चांगले आहे, दक्षिणेकडील दिशेला तोंड असावे.
घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण, आंब्याची पाने लावावीत. दारा नंतर रांगोळी काढावी. सनई, चौघडा आदी मंगलवाद्ये आवाजात लावावीत. गणेश चतुर्थ दिवशी गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जावी. गणेशाची साधना किंवा पूजा विधी खालील प्रमाणे करावी. Ganpati Chaturthi 2023
पूजनाचे महत्त्व
कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महागणपतीचे स्मरण केले जाते. कालश, शंख, घंटा पूजन करून पार्थिव गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यावेळेस ध्यान, आवाहन, आसन, पाद्यपूजा, अर्घ्य, स्नान, पंचामृतस्नान, गंधस्नान, पंचोपचार पूजन, अभिषेक, अत्तर, उष्णोदक स्नान या क्रमाने गणेशाचे षोडशोपचार पूजन केले जाते. परंपरेने आपले गुण गुरुजींना त्यांच्याकडून मंत्रक हे पूजन करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र व्यग्रता, अंतर्भाव काही कारणांनी गुरुजी मूळ नसतील तर विविध वेबसाइटवरून ऑनलाइन पूजा सांगितली जाते याचाही उपयोग करता येईल. Ganpati Chaturthi 2023
मात्र गणेश चतुर्थ दिवशीच पूजन होईल याची खबरदारी घ्यावी. पवि गणेश स्थापना व पूजन करताना दहा गुणाधार अतिरिक्त मंत्र म्हणून एकवीस दूर्वा अर्पण करतात.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदन्तेभवक्त्रे च तथा मूषकवाहन ।
नायक विशपुत्रेति सर्वसिद्धिप्रकारक ।
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।
यंदाचे गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
- मंगळवार – तारीख १९ सप्टेंबर : श्रीगणेश चतुर्थी
- या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
- गुरुवार – तारीख २१ सप्टेंबर : गौरी आवाहन
- सूर्योदयापासून दुपारी ३.५५पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
- शुक्रवार – तारीख २२ सप्टेंबर : गौरी पूजन
- शनिवार- तारीख २३ सप्टेंबर : गौरी विसर्जन
- सूर्योदयापासून दुपारी २:५६पर्यंत गौरी विसर्जन करावे.
- गुरुवार – तारीख २८ सप्टेंबर : अनंत चतुर्दशी