सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दक्षिण तालुका कार्याध्यक्ष पदी गणेश मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. सदरची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे यांनी केली. यावेळी नागेश बापू पवार, भास्कर खटके, मनोज साठे व छावाचे रतिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा Inquiry Committee | लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल आयुक्तांनी नेमली चौकशी समिती
वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथे हा निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बाबासाहेब आंबूळे, गोरख चव्हाण, रियाज शेख, टिपू मुल्ला, युवराज चव्हाण, आण्णा चव्हाण, मधुकर कांबळे, सोमा पाटील, दादा निकम, सुबान तांबोळी, चंद्रकांत पुजारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडीनंतर गणेश मोरे म्हणाले की, दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पोहोचवणार आणि पक्ष वाढवण्यासाठी कार्य करणार.






