– NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या तंबीचा असर
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यभरात विविध ठिकाणी रिक्त असलेले DPM पद वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिले जात होते. सदरचा गैरप्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आला. परिणामी यासंदर्भात NHM आयुक्त धीरज कुमार यांनी लेखी आदेश देण्याबरोबरच असे गैरप्रकार करणाऱ्या काही उपसंचालकांना तंबी दिली. परिणामी जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) पद डॉ. विलास सरवदे यांच्याकडे दिले आहे.
हे ही वाचा NHM | लेखी आदेश देऊनही NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या पत्राला केराची टोपली
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील महत्त्वाचे परंतु रिक्त असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) या पद पदावर परस्पर बेकायदेशीरपणे नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत. सदरची बाब वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे सदरच्या रिक्त पदी एखाद्या अधिकाऱ्याची-कर्मचाऱ्याची नेमणूक करताना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्या, असे लेखी आदेश खुद्द राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक धीरज कुमार (भा.प्र.से.) यांनी 3 मार्च 2023 रोजी दिले होते. असे असतानाही पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात वरिष्ठांची परवानगी घेतली नाही. या पदावर परस्पर व सोयीस्करपणे कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्याकडे दिले होते. सदरचे वृत्त “सत्ताकारण”ने उघडकीस आणले. परिणामी सदरचे पद कंत्राटी लेखा व्यवस्थापक यांच्याकडून काढून डॉ. विलास सरवदे यांच्याकडे दिले आहे.
हे ही वाचा Drug Scams | औषध घोटाळ्यातील स्टोअर किपर सोळंकी यांना बडतर्फ करा
काय आहेत केंद्राच्या सूचना : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात येते. यामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हे महत्वाचे पद आहे. या पदाची नियुक्ती प्रक्रीया राज्य स्तरावरील राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई कार्यालयाकडून केली जाते. परंतु सध्या राज्यभरात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पद रिक्त असलेल्या जागी जिल्हा स्तरावर दुस-या अधिका-यास किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यास परस्पर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार दिला गेला आहे. सदरचा अतिरिक्त पदभार देताना उपसंचालक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला जात नाही. स्वतःच्या मर्जीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे परस्पर पदभार सोपवला जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी NHM मधील कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक यांच्याकडेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) पदचा अतिरिक्त पदभार दिला आहे. यामुळे NHM मधील अनेक आर्थिक बाबींच्या फाईलवर एकाच व्यक्तीकडून दोन सह्या केल्या जात आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या जिल्ह्यात एकाच व्यक्तीकडे DPM आणि DAM पद आहे. त्यांची व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक फाईलींची चौकशी होणे गरजेचे आहे.
एकाच व्यक्तीकडे दोन पदे असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता
राज्यातील अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदाचा पदभार दिला आहे. यामुळे एकाच वेळेस, एकाच फाईलवर, एकाच व्यक्तीच्या दोन सह्या करून आर्थिक फाईलींचा निपटाणारा केला जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी DAM यांच्याकडेच DPM पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. यासाठी वरिष्ठांची परवानगी मात्र घेतली नाही. परिणामी उपसंचालकांना तीन-चार जिल्ह्यातील विविध कामे एकाच पुरवठादारास देनेही सोपे जात होते. यामुळे 15वा वित्त आयोग आणि NHM चा विविध योजना, सेवा-सुविधांसाठी आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वहीत साधता येत हाते. परंतु आता स्वतंत्र अधिकाऱ्यांकडे DPM पद दिल्याने या प्रकारास आळा बसण्यास मदत होणार आहे.
हे ही वाचा Maratha Reservation News | मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात